Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»उच्चस्तरीय चौकशीसह मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची मदत द्या : आमदार अमित गोरखे
पिंपरी चिंचवड

उच्चस्तरीय चौकशीसह मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची मदत द्या : आमदार अमित गोरखे

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comMay 29, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

अवैध दारू अड्ड्यांवर २४ तासांत कारवाईची मागणी; घटनास्थळी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन

पिंपरी-चिंचवड | २९ मे २०२६…फुगेवाडी परिसरात गुरुवारी (दि. २८ मे) एकाच दिवशी आठ नागरिकांचा झालेला संशयास्पद मृत्यू शहरासाठी अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक असल्याचे सांगत भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, अशीही मागणी त्यांनी केली.

घटनेची माहिती मिळताच आमदार अमित गोरखे यांनी फुगेवाडी परिसराला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधून घटनेबाबत सविस्तर माहिती घेतली.

“एकाच परिसरातील आठ नागरिकांचा एकाच दिवशी मृत्यू होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या घटनेमागील सत्य समोर येणे आवश्यक असून नागरिकांच्या मनातील संशय दूर करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे,” असे आमदार गोरखे यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांना पत्र

या घटनेची गंभीर दखल घेत आमदार गोरखे यांनी मुख्यमंत्री तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांना अधिकृत पत्र पाठवून तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पत्रात त्यांनी पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत :

💮मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत द्यावी.

💮दापोडी, फुगेवाडीसह शहरातील झोपडपट्टी आणि कामगार वस्त्यांमधील अवैध हातभट्टी व बेकायदेशीर दारू अड्डे पुढील २४ तासांत उद्ध्वस्त करावेत.

💮सर्व मृतांचे शवविच्छेदन व फॉरेन्सिक अहवाल तातडीने प्राप्त करून मृत्यूचे नेमके कारण जाहीर करावे.

💮विषारी दारू अथवा अन्य बेकायदेशीर कारणांमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधित सूत्रधारांवर कठोर कलमांखाली गुन्हे दाखल करावेत.

💮संबंधित भागात रात्रीची पोलीस गस्त वाढवून गुप्तवार्ता यंत्रणा अधिक सतर्क करावी.

“तपासात हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही”

या प्रकरणात कोणताही राजकीय हस्तक्षेप अथवा तपास भरकटवण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशाराही आमदार अमित गोरखे यांनी दिला. “पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

दोघे जण मृत्यूशी झुंज देत

या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असताना सुभाष डिगीकर आणि अक्षय अवसरमल हे दोघे जण सध्या रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. आमदार गोरखे यांनी त्यांच्या प्रकृतीचीही विचारपूस केली.

“पिंपरी-चिंचवड शहराला अवैध धंद्यांचा विळखा बसू दिला जाणार नाही. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी गृहविभागाकडे सातत्याने पाठपुरावा करणार,” अशी ग्वाही आमदार अमित गोरखे यांनी दिली.

 

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसमाजाच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्यांचा सन्मान इतरांसाठी प्रेरणादायी – महापौर रवि लांडगे
Next Article ६० कोटींच्या उपसूचना घोटाळ्यानंतर मनपात मोठी खळबळ
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?