Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्यांचा सन्मान इतरांसाठी प्रेरणादायी – महापौर रवि लांडगे
पिंपरी चिंचवड

समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्यांचा सन्मान इतरांसाठी प्रेरणादायी – महापौर रवि लांडगे

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comMay 29, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

विविध क्षेत्रातील २६ मान्यवरांचा ‘सरस्वती भूषण गुणगौरव पुरस्कार २०२६’ ने गौरव

पिंपरी, दि. २९ मे २०२६ : समाजाच्या उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणे ही समाजाची जबाबदारी आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान झाल्याने नव्या पिढीला प्रेरणा मिळते आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होते, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांनी केले.

ऑल स्पोर्ट्स अँड मार्शल आर्ट्स फेडरेशन ऑफ पुणे यांच्या वतीने कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २६ मान्यवरांचा ‘सरस्वती भूषण गुणगौरव पुरस्कार २०२६’ देऊन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते महापौर कार्यालयात गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.या प्रसंगी फेडरेशनचे अध्यक्ष सुनील साठे, सचिव मनोज सोनावणे तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान इरा सोनावणे यांनी महापौर रवि लांडगे यांच्या कार्यावर आधारित स्वलिखित कवितेचे सादरीकरण केले. त्यांच्या प्रभावी सादरीकरणास उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

यावेळी बोलताना महापौर रवि लांडगे म्हणाले की, समाजातील सकारात्मक परिवर्तनासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती या समाजाच्या खऱ्या प्रेरणास्थान असतात. कला, क्रीडा, शिक्षण, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव केल्याने त्यांच्या कार्याला अधिक बळ मिळते. पिंपरी चिंचवड शहरातील अशा गुणवंत व्यक्तींना भविष्यातही प्रोत्साहन व पाठबळ देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

सन्मानित मान्यवर

मनोज साळवे (क्रीडा महर्षी पुरस्कार २०२६), सम्यक कांबळे (कराटे क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य), श्री. पाटील (उत्कृष्ट स्पोर्ट्स अकादमी), जितेंद्र शिंगारे (कराटे क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य), इस्प्रित कटारिया (उत्कृष्ट बॉक्सिंग खेळाडू), उर्मिला जाधव (शैक्षणिक नेतृत्वातील दूरदृष्टीकोन पुरस्कार), दिपाली भादुले (योगा व झुंबा क्षेत्रातील उत्कृष्ट शिक्षक), डॉ. मंजुषा इंगवले (वनस्पतीशास्त्र विभागातील उत्कृष्ट शिक्षक), विश्वास गरजमल (समाजरत्न पुरस्कार), युवराज मनोहर कांबळे (उत्कृष्ट कराटे खेळाडू), आकाश (अभिनय व मॉडेलिंग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य), विजय भस्मे (आर्टिफिशियल स्मार्ट टीचर), हेमराज थापा (क्रीडा महर्षी पुरस्कार २०२६), सुधा ढवळे (कबड्डी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य), गणेश ठोकळ (प्रभावी शिवव्याख्याते), सुदेश गायकवाड (क्रीडा महर्षी पुरस्कार २०२६), राजेंद्र कांबळे (यशस्वी उद्योजक), जितू कटारिया (उत्कृष्ट बॉक्सिंग प्रशिक्षक), धर्मपाल भरणे (युवा उद्योजक), रोहित आढागळे (उत्कृष्ट स्केटिंग प्रशिक्षक), श्रीधरण थांबा (हॉकी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य), श्वेता लिमन (मार्शल आर्ट क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य), मयंक कांबळे (कराटे क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य), प्रतिभा भोसले (अभिनय व मॉडेलिंग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य), रमेश शेलार (कराटे क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य) आणि पूजा भोसले (यशस्वी उद्योजक) यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

Post Views: 5
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleफुगेवाडीत विषारी दारूचा कहर
Next Article उच्चस्तरीय चौकशीसह मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची मदत द्या : आमदार अमित गोरखे
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?