पिंपरी-चिंचवड : भोसरी परिसरात विनापरवाना कोयता बाळगणाऱ्या एका तरुणाला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी आर्म अॅक्ट तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१०/२०२६ नुसार भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई दि. २७ मे २०२६ रोजी पहाटे १:०५ वाजण्याच्या सुमारास हरी ओम सोसायटीसमोरील रोड, सॅण्डवीक कॉलनी, दिघी रोड, भोसरी येथे करण्यात आली. पोलिसांनी संशयिताची तपासणी केली असता त्याच्याकडे विनापरवाना एक कोयता आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या कोयत्याची किंमत सुमारे २०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी पोलीस शिपाई वैभव पुरुषोत्तम वाटकर (वय २९) यांनी फिर्याद दिली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव क्रिश सुरेंद्र सिंग (वय १९, रा. गणेशनगर ०३, बोपखेल, पुणे) असे आहे.
पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड यांनी घातक शस्त्रे बाळगण्यास मनाई आदेश जारी केलेले असताना आरोपीने त्याचे उल्लंघन करून अवैधरित्या शस्त्र जवळ बाळगल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार काळे करीत आहेत.