Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर व्यवस्थापनाचा नवी मुंबई महापालिकेकडून अभ्यास
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर व्यवस्थापनाचा नवी मुंबई महापालिकेकडून अभ्यास

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comMay 27, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी, दि. २७ मे २०२६ : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मालमत्ता कर व्यवस्थापन अधिक प्रभावी, पारदर्शक आणि महसूलवृद्धीस चालना देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या शिष्टमंडळाने आज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाला अभ्यासभेट दिली. यावेळी उपायुक्त सचिन पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मालमत्ता कर प्रणालीची सविस्तर माहिती शिष्टमंडळाला दिली.

उपायुक्त सचिन पवार यांनी मालमत्ता कर व्यवस्थापनातील विविध प्रक्रिया, महसूलवाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना तसेच तंत्रज्ञानाधारित प्रणालींबाबत माहिती देताना सांगितले की, महापालिका मालमत्ता कर प्रणाली अधिक पारदर्शक, डिजिटल आणि नागरिककेंद्रित करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. जीआयएस सर्वेक्षण, डिजिटल करप्रणाली आणि कार्यक्षम महसूल व्यवस्थापनाच्या माध्यमातून नागरिकांना अधिक सुलभ व दर्जेदार सेवा देण्यावर भर दिला जात आहे.

ते पुढे म्हणाले की, विविध महापालिकांमधील अशा अभ्यासभेटींमुळे प्रशासनातील सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण होते. त्यामुळे महसूल व्यवस्थापन अधिक सक्षम होण्यास मदत होते आणि नागरिकांना विश्वासार्ह व जलद सेवा उपलब्ध करून देणे शक्य होते. स्थानिक स्वराज्य संस्थांनी एकमेकांच्या यशस्वी उपक्रमांचा अभ्यास करून त्यांचा अवलंब करणे ही विकासाभिमुख प्रक्रिया असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी नवी मुंबई महापालिकेच्या शिष्टमंडळाने मालमत्ता कर आकारणीची कार्यपद्धती, सर्वेक्षण व पुनर्मूल्यांकन प्रक्रिया, लेटिंग रेट निर्धारण, महसूलवाढीसाठी राबविण्यात येणारे उपक्रम, जनजागृती मोहिमा तसेच डिजिटल प्रणालींच्या वापराबाबत विशेष माहिती जाणून घेतली.

तसेच जीआयएस आधारित सर्वेक्षण, थकबाकी वसुलीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि नागरिकाभिमुख सेवा अधिक सक्षम करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहितीही शिष्टमंडळाला देण्यात आली.

या अभ्यासभेटीमुळे दोन्ही महापालिकांमध्ये प्रशासनातील सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण होऊन अधिक कार्यक्षम, तंत्रज्ञानाधारित आणि नागरिकाभिमुख कर व्यवस्थापनाला चालना मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Post Views: 9
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनागरी सुविधांच्या नियोजनासाठी महत्त्वाची प्रक्रिया असलेल्या जनगणना मोहिमेला गती
Next Article मनपा शाळेजवळील दुर्गंधीयुक्त कचरा वर्गीकरण केंद्र हटवले; विद्यार्थ्यांना दिलासा
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?