Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»नागरी सुविधांच्या नियोजनासाठी महत्त्वाची प्रक्रिया असलेल्या जनगणना मोहिमेला गती
पिंपरी चिंचवड

नागरी सुविधांच्या नियोजनासाठी महत्त्वाची प्रक्रिया असलेल्या जनगणना मोहिमेला गती

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comMay 27, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी, दि. २७ मे २०२६ …..देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि नागरी विकासासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या जनगणना प्रक्रियेत जनगणना कर्मचारी सक्रियपणे योगदान देत आहेत.

शहरातील विविध विभागांतील कर्मचारी सध्या घरभेटीद्वारे माहिती संकलनाचे काम करत असून, अचूक आणि विश्वासार्ह माहिती नोंदविण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने मोहीम राबविली जात आहे. वाढती लोकसंख्या आणि बदलत्या नागरी गरजांच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील विकास आराखडे तयार करण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात आहे.

जनगणना ही केवळ लोकसंख्येची आकडेवारी गोळा करण्यापुरती मर्यादित नसून शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, वाहतूक, निवास, सार्वजनिक सुविधा आणि पायाभूत विकास यांसारख्या क्षेत्रांतील धोरणनिर्मितीसाठी आधारभूत ठरणारी व्यापक प्रक्रिया आहे. नागरिकांकडून संकलित होणाऱ्या माहितीच्या आधारे विविध शासकीय योजना आणि सेवा अधिक परिणामकारकपणे नियोजित केल्या जातात. त्यामुळे माहितीची अचूकता आणि नागरिकांचे सहकार्य या दोन्ही बाबींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

शहरात निवडणूक आचारसंहितेची पार्श्वभूमी आणि काही प्रशासकीय निर्बंध असतानाही नागरिकांना दैनंदिन सेवा सुरळीत मिळाव्यात यासाठी महापालिका प्रशासनाने विभागनिहाय समन्वय आणि पर्यायी नियोजनावर भर दिला आहे. जनगणना जबाबदारी आणि नियमित नागरी सेवा यांचा समतोल राखत प्रशासनाकडून कामकाज सुरू ठेवण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

उन्हाळ्याची तीव्रता, बदलते हवामान आणि विस्तीर्ण नागरी क्षेत्र अशा विविध आव्हानांमध्येही जनगणना कर्मचारी सातत्याने घरभेटी घेऊन माहितीचे योग्य संकलन करत आहेत. अनेक भागांत नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून आवश्यक तपशील नोंदविले जात असून, या प्रक्रियेमुळे शहराच्या लोकसंख्याविषयक आणि सामाजिक वास्तवाचे अधिक अचूक चित्र समोर येण्यास त्यामुळे मदत होणार आहे.

उप आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी सचिन पवार यांनी सांगितले की, जनगणना जबाबदारी आणि नियमित नागरी सेवा यांचा समतोल राखत कर्मचारी पार पाडत असलेले हे काम शहराच्या भविष्यातील विकास नियोजनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून , जनगणना कर्मचारी अत्यंत समर्पणाने घरभेटीद्वारे माहिती संकलनाचे काम करत आहेत. जनगणना प्रक्रियेत संकलित होणारी माहिती पूर्णपणे गोपनीय राखली जाते आणि ती केवळ शासकीय नियोजनासाठीच वापरली जाते. नागरिकांनी कोणतीही शंका न बाळगता अचूक व संपूर्ण माहिती द्यावी, यामुळे जनगणना प्रक्रिया अधिक प्रभावी आणि विश्वासार्ह होईल.

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले की, जनगणना ही केवळ सांख्यिकीय प्रक्रिया नसून शहर आणि देशाच्या विकासाचा मूलभूत आधार आहे. अचूक माहितीच्या आधारेच भविष्यातील पायाभूत सुविधा, नागरी सेवा आणि विविध विकास योजनांचे प्रभावी नियोजन करता येते. त्यामुळे नागरिकांनी जनगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनाला आवश्यक सहकार्य करावे.

महापालिका प्रशासनाने नागरिकांना जनगणना कर्मचाऱ्यांना आवश्यक सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. प्रगणक घरभेटीसाठी आल्यानंतर त्यांना योग्य आणि संपूर्ण माहिती द्यावी. तसेच जनगणना प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारचा ओटीपी मागितला जात नाही, त्यामुळे नागरिकांनी अफवा किंवा गैरसमजांना बळी न पडता अधिकृत जनगणना कर्मचाऱ्यांशी विश्वासाने सहकार्य करावे, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

Post Views: 6
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleरहाटणीतील ‘सुविधा स्पा’वर पोलिसांचा छापा; वेश्याव्यवसाय प्रकरणी स्पा चालक अटक
Next Article पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर व्यवस्थापनाचा नवी मुंबई महापालिकेकडून अभ्यास
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?