पिंपरी,…पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने रहाटणी परिसरातील ‘सुविधा स्पा’वर छापा टाकून वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या स्पा चालकाला अटक केली आहे. या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १४३(३) तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ मधील कलम ३, ४, ५ व ७ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई दि. २५ मे २०२६ रोजी रात्री ९.५६ वाजण्याच्या सुमारास रहाटणी येथील अंबिका कॉम्पलेक्समधील ‘सुविधा स्पा’ येथे करण्यात आली. दि. २६ मे रोजी पहाटे ४.२८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी संतोष सूर्यकांत मास्के (वय ४३), पोलीस हवालदार, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी अजित गोरख पोळप (वय ३७) याला अटक केली असून तो सध्या हिंजवडी येथील आदर्शनगर परिसरात राहत असल्याचे समोर आले आहे. त्याचा मूळ पत्ता फलटण, जि. सातारा येथील आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा स्पा सेंटरच्या आडून तीन महिलांकडून पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करून घेत होता. त्यातून मिळणाऱ्या पैशांतून तो स्वतःची उपजीविका करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
विशेष म्हणजे संबंधित स्पा सेंटरच्या अगदी जवळ जीवनज्योती हॉस्पिटल आणि प्रथमेश क्लिनिक यांसारखी सार्वजनिक ठिकाणे असतानाही हा प्रकार सुरू असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि मेटे करीत आहेत.