पिंपरी-चिंचवड : दक्षिण म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अंमली पदार्थांविरोधातील कारवाईदरम्यान पोलिसांनी एका आरोपीला गांजासह अटक केली आहे. ही कारवाई महाळुंगे परिसरातील सदगुरु मिसळजवळ करण्यात आली.
दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ४३६/२०२६ अन्वये एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क), २०(ब)(ii)(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २६ मे २०२६ रोजी सायंकाळी ६.१८ वाजण्याच्या सुमारास मौजे महाळुंगे, ता. खेड, जि. पुणे येथील सदगुरु मिसळजवळील मोकळ्या जागेत आरोपी गहिनीनाथ लक्ष्मण जोशी (वय ६०) याच्या ताब्यातून ३७ हजार ५५० रुपये किंमतीचा ७५१ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. आरोपी हा सदगुरु मिसळजवळील परिसरात वास्तव्यास असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी पोलीस शिपाई महेश नामदेव गायकवाड (बक्कल नं. ३२०६), दक्षिण म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घुले करीत आहेत.