Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»प्रशासकीय संवेदनशीलतेचे दर्शन : हलाकीच्या गर्तेत सापडलेल्या ‘त्या’ कुटुंबासाठी जिल्हाधिकारी, तहसीलदार ठरले देवदूत
महाराष्ट्र

प्रशासकीय संवेदनशीलतेचे दर्शन : हलाकीच्या गर्तेत सापडलेल्या ‘त्या’ कुटुंबासाठी जिल्हाधिकारी, तहसीलदार ठरले देवदूत

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comMay 27, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

अंबड प्रतिनिधी……अंबड तालुक्यातील शासकीय यंत्रणा ही केवळ कागदी कारभारापुरती मर्यादित नसून संकटात सापडलेल्या नागरिकांचा आधारवडही ठरू शकते, याचा प्रत्यय अंबड येथे आला आहे. एका वृत्तवाहिनीवर प्रसिद्ध झालेल्या हृदयद्रावक बातमीची तातडीने दखल घेत जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या सूचनेनुसार अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या शर्मा कुटुंबाला तातडीचा दिलासा दिला आहे.

हृदयद्रावक परिस्थिती; प्रशासनाची तात्काळ धाव

अंबड शहरातील मोहन टॉकीज परिसरातील जुन्या वेशीजवळ शर्मा कुटुंब भंगारासारख्या तात्पुरत्या निवाऱ्यात राहत आहे. कुटुंबात दोन बहिणी आणि एक भाचा असून त्यांची आर्थिक व सामाजिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. एका महिलेला कुष्ठरोगाची बाधा झाल्याने तिच्या हातापायांची बोटे झिजली आहेत, तर तिचा मुलगा मुका-बहिरेपणामुळे अनेक अडचणींना सामोरे जात आहे. पावसाळ्यात झोपडीत गुडघाभर पाणी साचत असल्याने त्यांचे जगणे अक्षरशः नरकयातना बनले होते.ही बाब समोर येताच तहसीलदार विजय चव्हाण यांनी सायंकाळी महसूल पथकासह घटनास्थळी भेट देत कुटुंबाची प्रत्यक्ष पाहणी केली.

जागीच मदतीचा वर्षाव

प्रशासनाने केवळ सांत्वन न करता तातडीने मदतीची ठोस पावले उचलली.

💮कुष्ठरोगग्रस्त महिलेकडे आधार कार्ड नसल्याने शासकीय योजनांचा लाभ मिळत नव्हता. तहसीलदारांनी तत्काळ आधार केंद्र चालकाला बोलावून व्होटर आयडीच्या आधारे जागीच आधार नोंदणी प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे आता त्यांना दरमहा २५०० रुपयांच्या मानधनाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

💮पुरवठा विभागामार्फत कुटुंबाला तातडीने ‘अंत्योदय रेशन कार्ड’ मंजूर करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या अन्नाचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.

💮व्यवसायासाठी कुटुंबाने केवळ दोन हजार रुपयांची मदत मागितली होती. मात्र तहसीलदारांनी स्वतःच्या खिशातून पाच हजार रुपयांची रोकड देत संवेदनशीलतेचे उदाहरण घालून दिले.

स्वावलंबनासाठी नवा हातगाडा

भाजीपाला विकून उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबाचा भाड्याचा हातगाडा मोडला होता. पुन्हा कोणासमोर हात पसरावे लागू नये म्हणून महसूल प्रशासनाने त्यांच्यासाठी स्वतःच्या मालकीचा नवा हातगाडा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे.

पक्क्या घरासाठी प्रशासन सरसावले

या कुटुंबाला कायमस्वरूपी दिलासा मिळावा यासाठी तहसीलदार, नायब तहसीलदार आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत पक्के शेड किंवा घर उभारून देण्याचा निर्धार केला आहे. तसेच शासकीय घरकुल योजनेंतर्गत त्यांना कायमस्वरूपी निवारा मिळवून देण्यासाठी तांत्रिक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

“प्रशासन नव्हे, हे आमचे देवदूत…”

महसूल विभागाचे पथक प्रत्यक्ष दारात पोहोचल्याचे पाहून शर्मा कुटुंबाला अश्रू अनावर झाले. “साक्षात देवच आमच्या मदतीला धावून आला,” अशा भावनिक शब्दांत त्यांनी जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांचे आभार मानले.

प्रशासनाच्या या संवेदनशील आणि मानवतावादी भूमिकेचे अंबड शहरासह परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

 

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleभोकरदनमध्ये कुंटणखान्यावर पोलिसांची धाड
Next Article सदगुरु मिसळजवळ गांजासह एक जण अटकेत; ७५१ ग्रॅम अंमली पदार्थ जप्त
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

धुळे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व ग्रंथालय प्रकल्पासाठी सुधारित प्रस्ताव सादर करावा – सामजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

June 29, 2026

मनमाडमध्ये उभारण्यात येणार भव्य ‘भीमसृष्टी’

June 29, 2026

महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार

June 29, 2026

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?