पिंपरी-चिंचवड : हिंजवडी पोलीस ठाण्याचे हद्दीतील नेले दत्तवाडी येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दाम्पत्यावर लाकडी बांबू व दगडाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार दि. २४ मे २०२६ रोजी रात्री सुमारे १०.१५ वाजण्याच्या सुमारास सर्व्हे नं. ४७/१, ढमाले नगर, नेरे दत्तवाडी, ता. मुळशी, जि. पुणे येथे घडला. याप्रकरणी गोकुळ भागवत कुंभार (वय ४३, व्यवसाय चालक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दि. २५ मे २०२६ रोजी पहाटे ३.५३ वाजता गुन्हा नोंद करण्यात आला.
या प्रकरणात नंदकिशोर मिश्रा (वय २८) व त्यांचा मेव्हणा (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्याविरुद्ध बी.एन.एस. कलम ११८(२), ११७(२), ३५२, ३५१(२), ३२४(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांनी आरोपींना “पराचा कलर सावकाश द्या” असे सांगितल्याच्या कारणावरून आरोपींनी शिवीगाळ करत लाकडी बांबू व दगडाने मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादी व त्यांच्या पत्नीला गंभीर दुखापत झाली असून फिर्यादींच्या पत्नीचा दात पडल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच तिच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून नुकसान केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास सपोनि वांगणेकर करीत आहेत.