Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»कुराश बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणाला वेग; पोलिस भरतीतील उमेदवारांच्या चौकशीचे आदेश
पुणे

कुराश बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणाला वेग; पोलिस भरतीतील उमेदवारांच्या चौकशीचे आदेश

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comMay 25, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे……कुराश या खेळाच्या बनावट क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे पोलिस सेवेत नियुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांविरोधात चौकशी व कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने दिले आहेत.

मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेने दि. १९ मे २०२६ रोजी क्रीडा विभागाकडे यासंदर्भात लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत क्रीडा आयुक्त दीपक सिंगला यांच्या कार्यालयाने प्रकरणाची गंभीर नोंद घेतली आहे.

क्रीडा विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, संबंधित उमेदवार हे सोलापूर जिल्ह्यातील असल्याचे निदर्शनास आले असून त्यांच्या क्रीडा प्रमाणपत्रांची पडताळणी पुणे विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे.

शासन निर्णय दि. ३० जून २०२२ मधील तरतुदीनुसार, विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा पुणे विभाग यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून संबंधित उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची फेरपडताळणी केली जाणार आहे. आवश्यकतेनुसार उमेदवारांची क्रीडा कौशल्य चाचणीही घेण्यात येणार असून त्याचा अहवाल तात्काळ संचालनालयास सादर करण्याचे निर्देश क्रीडा आयुक्तांनी दिले आहेत.

यासंदर्भात मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी सांगितले की, “बनावट क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय सेवेत प्रवेश मिळवण्याचे प्रकार हे केवळ शासनाची फसवणूक नसून प्रामाणिक व मेहनती खेळाडूंवर अन्याय करणारे आहेत. अशा गैरप्रकारांमुळे पात्र उमेदवारांचे हक्क हिरावले जातात. या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. भविष्यात अशा प्रकारांना आळा बसण्यासाठी प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि काटेकोर करण्यात यावी.”

संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर म्हणाले की, “क्रीडा आरक्षणाचा गैरवापर थांबवण्यासाठी शासनाने राज्यभर विशेष पडताळणी मोहीम राबवावी. अन्यथा आमच्या संस्थेच्या वतीने राज्यभर आंदोलन छेडले जाईल.”

सदर प्रकरणामुळे पोलिस भरती प्रक्रियेतील क्रीडा आरक्षण आणि प्रमाणपत्र पडताळणी यंत्रणेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून चौकशी अहवालानंतर पुढील कारवाईकडे आमच्या संस्थेचे बारकाईने लक्ष आहे. त्यानंतरच संस्थेची पुढील दिशा ठरवली जाईल, असेही कुचेकर यांनी स्पष्ट केले.

दि. १९ मे २०२६ रोजी सादर करण्यात आलेल्या निवेदनावर संस्थाध्यक्ष विकास कुचेकर, शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, उपाध्यक्ष काळूराम लांडगे, डॉ. यामिनी अडबे, सचिव गजानन धाराशिवकर आणि कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी यांच्या सह्या होत्या.

Post Views: 25
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleरुद्रंग प्रस्तुत अभिजात साहित्य अभिवाचन मैफलीत श्रोते मंत्रमुग्ध
Next Article दुकानांसमोरील अतिक्रमण १५ दिवसात हटवा;अन्यथा कारवाई;
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी-चिंचवडकरांना संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सुरक्षित व सुव्यवस्थित राखण्याचे विनम्र आवाहन… श्री.पवन शर्मा

June 29, 2026

फॉरेक्स ट्रेडिंगच्या आमिषाने उद्योजकाची ८८.१९ लाखांची ऑनलाइन फसवणूक; बावधन पोलिसांत गुन्हा दाखल

June 27, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत आळंदीत अत्याधुनिक PET-CT युनिटचे लोकार्पण

June 27, 2026

हिंजवडीत ब्राऊन शुगरचा मोठा साठा जप्त; १२.६६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, एकाला अटक

June 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?