पिंपरी-चिंचवड : वाकड पोलीस ठाण्यात ताथवडे येथील घरफोडीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. ही घटना ११ मे २०२६ रोजी दुपारी ४ वाजल्यापासून ते २० मे २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास सर्व्हे नं. १४२/२, नवले पेट्रोल पंपासमोर, नवलेवस्ती, ताथवडे येथे घडली.
याप्रकरणी सुखदेव दिनकर पवार (वय ५४, रा. नवलेवस्ती, ताथवडे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७०/२०२६ बीएनएस कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराचे उघडे दार पाहून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटात ठेवलेले सुमारे २२.५ तोळे वजनाचे अंदाजे १८ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणात सचिन भगवान सहजराव (वय ४३, रा. पवार वस्ती, ताथवडे) याला अटक करण्यात आली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक देशमुख करीत आहेत.