पिंपरी : संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात ३३ लाख ९० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या चेन चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २२ मे २०२६ रोजी सकाळी ९.४० ते ९.४५ वाजण्याच्या दरम्यान संतोषी माता चौक येथील शिवम ज्वेलर्स, नेहरूनगर येथे घडला.
याप्रकरणी उमेश छगनलाल जैन (वय ५३, व्यवसाय – सोने-चांदी व्यापार, रा. शंखेश्वर दर्शन बिल्डिंग, नेहरूनगर, पिंपरी) यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बच्चु आशिष गागुंली (वय ३६, रा. फ्लॅट नं. ०८, भोसले आर्केड, नेहरूनगर, पिंपरी) याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने चोरीच्या उद्देशाने दुकानातून २२ कॅरेट सोन्याच्या विविध आकारांच्या एकूण ३९ चेन चोरी केल्या. या चेनचे एकूण वजन २२५.८०० ग्रॅम असून त्यांची किंमत सुमारे ३३ लाख ९० हजार रुपये आहे.या प्रकरणी आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.