भोसरी : भोसरी एमआयडीसी परिसरातील इंडियन पॉलिमर्स कंपनीत तयार मालाचा अपहार करून कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अशोककुमार मिठालाल जैन (वय ५३, रा. चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे.
एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २६२/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (४), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १ जुलै २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत इंडियन पॉलिमर्स, प्लॉट नं. ३०५/२, सेक्टर १०, एमआयडीसी भोसरी येथे घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी मिलिंद श्रीपाद कुलकर्णी (वय ५८, रा. पिंपळे गुरव) आणि भगवान सुंदरराव लिंगायत (वय ४०, रा. मोशी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादी यांच्या कंपनीत कामगार म्हणून कार्यरत होते. त्यांनी संगनमत करून कंपनीतील तयार झालेला माल मित्र गुरुप्रसाद पाटील याच्या मदतीने बाहेर काढला. सुमारे ९ लाख ४५ हजार २४९ रुपयांचा माल विक्री करून त्यातून मिळालेली रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरत कंपनीची फसवणूक केल्याचा आरोप आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तळेकर करीत आहेत.