पिंपरी-चिंचवड : चिखली परिसरातील एका ज्वेलर्स दुकानातून चांदीचे दागिने चोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपी महिलांना पोलिसांनी अटक केली आहे.याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१७/२०२६ नोंद करण्यात आला आहे. हा गुन्हा भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(अ), ६२, ३(५) अन्वये दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २० मे २०२६ रोजी सकाळी १०.३० ते १०.४५ वाजण्याच्या सुमारास बालाजी ज्वेलर्स येथे ही घटना घडली. दुकानात आलेल्या महिला आरोपींनी सुमारे ५० हजार रुपये किंमतीच्या १८० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या तीन पैजणांची लबाडीने व अप्रामाणिक हेतूने चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी सुनिल जवाहरलाल पवार (वय ३२, रा. चिंचवडे नगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी निलाबाई बाबु शिंदे (वय ५५), फुलाबाई भानुदास ढोकळे (वय ६०) आणि इंदाबाई दिलीप ढोकळे (वय ६०, सर्व रा. नागेवाडी, जि. जालना) यांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार टिळेकर करीत आहेत.