पिंपरी-चिंचवड, दि. २१ मे २०२६ : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात यावेत, यासाठी पिंपरी-चिंचवड शहर जयंती महोत्सव समितीच्या वतीने महापौर रवीजी लांडगे यांना निवेदन देण्यात आले.
गुरुवारी (दि. २१) सकाळी ११.३० वाजता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर कार्यालयात समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष अशोक गोरख खरात यांच्या नेतृत्वाखाली ही भेट घेण्यात आली. यावेळी जयंती महोत्सवाचे कार्यक्रम उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावेत, यासाठी महापालिकेने सहकार्य करावे, अशी मागणी करण्यात आली.
महापौर रवीजी लांडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून जयंती महोत्सवाच्या आयोजनासाठी आवश्यक त्या कायदेशीर बाबींची पूर्तता करून कार्यक्रम सुरळीत पार पाडण्याच्या सूचना दिल्या.
या प्रसंगी माजी नगरसेवक राजाभाऊ दुर्गे, आशाताई काळे, रेखाताई दूधभाते, विठ्ठल देवकाते, शिवाजी बिटके, अरुण पाडूळे, नरेंद्र चऱ्हाटे, धनंजय तानले, गोरोबा शेळके, गणेश खरात, सुरेश खरात, राजू धायगुडे आदींसह जयंती महोत्सव समितीचे सदस्य उपस्थित होते.
