Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरी-चिंचवड शहर कोंडीमुक्त करण्यासाठी सक्षम ‘पार्किंग पॉलिसी’ लवकरच :- अभिषेक बारणे
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहर कोंडीमुक्त करण्यासाठी सक्षम ‘पार्किंग पॉलिसी’ लवकरच :- अभिषेक बारणे

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comMay 20, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

नव्या पार्किंग धोरणामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि व्यावहारिक उपायांचा समावेश

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती वाहनांची संख्या आणि त्यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. शहरात एक सक्षम आणि शिस्तबद्ध ‘पार्किंग पॉलिसी’ तयार करण्यासाठी बीआरटीएस विभाग आणि महापालिकेच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त समन्वयाने हे नवे धोरण लवकरच शहरात अंमलात आणले जाणार आहे, अशी माहिती स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी दिली आहे.

या बैठकीदरम्यान बीआरटीएस विभागाकडून नवीन पार्किंग पॉलिसीचे सविस्तर सादरीकरण (प्रेझेंटेशन) करण्यात आले. या सादरीकरणामध्ये धोरणाची तांत्रिक आणि व्यावहारिक बाजू मांडण्यात आली. त्यावर सर्व बाजूंनी सविस्तर चर्चा झाल्यानंतर, धोरण अधिक लोकाभिमुख आणि त्रुटीरहित करण्यासाठी काही महत्त्वाच्या ठिकाणी आवश्यक दुरुस्त्या व सुधारणा करण्याच्या सूचना स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्याकडून देण्यात आल्या. या सूचनांचा समावेश करून हे नवीन पार्किंग धोरण अत्यंत प्रभावीपणे आणि लवकरच अंमलात आणले जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या नव्या पार्किंग धोरणामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि व्यावहारिक उपायांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रत्येक भागाच्या गरजेनुसार ‘एरिया बेस्ट पार्किंग’ व्यवस्था विकसित केली जाईल, तर नागरिकांच्या सोयीसाठी ‘कलर कोडिंग सिस्टीम’ लागू केली जाणार आहे. याशिवाय, रस्त्यालगत घर असणाऱ्या स्थानिक रहिवाशांना त्रास होऊ नये म्हणून त्यांना विशेष ‘पार्किंग परमिट’ दिले जाईल. शहरातील मुख्य रस्त्यांवर होणारी जड वाहनांची पार्किंग पूर्णपणे बंद करून त्यांच्यासाठी शहराबाहेर जागा निश्चित केली जाणार आहे. विशेष म्हणजे, अनावश्यक पार्किंग टाळण्यासाठी थेट सॅटेलाईटद्वारे जागांची पडताळणी करण्यात येणार असून, या संपूर्ण व्यवस्थेवर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र ‘पार्किंग मॅनेजमेंट’ कक्ष स्थापन केला जाईल. या धोरणात वाहनचालकांसह पादचारी आणि सायकलस्वारांसाठीही स्वतंत्र व सुरक्षित जागा सुनिश्चित करण्यात आली आहे.या बैठकीला सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, कार्यकारी अभियंता सुनील पवार, आयटीडीपी चे प्रतिनिधी आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

“पिंपरी-चिंचवड वेगाने वाढणारे शहर असून येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी केवळ तात्पुरते उपाय करून चालणार नाही, तर एक शाश्वत आणि शिस्तबद्ध यंत्रणा उभारण्याची गरज आहे. याच उद्देशाने आम्ही या नव्या पार्किंग धोरणावर सविस्तर चर्चा केली आहे. बीआरटीएस विभागाच्या सादरीकरणानंतर त्यात अधिक सुधारणा करण्यासाठीच्या सूचना केल्या आहेत, ज्या या धोरणाला अधिक परिपूर्ण बनवतील. हे धोरण राबवताना केवळ वाहतूक सुरळीत करणे एवढाच हेतू नसून, पादचारी आणि सायकल चालवणाऱ्यांनाही सुरक्षित रस्ते मिळवून देणे हा आमचा प्रयत्न आहे. ऑन-स्ट्रीट आणि ऑफ-स्ट्रीट पार्किंगचे दर ठरवताना सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार पडणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल. सर्व तांत्रिक त्रुटी दूर करून, ‘आपले शहर, आपली शिस्त’ या भावनेतून हे उत्तम पार्किंग धोरण लवकरच नागरिकांच्या सेवेत आणले जाईल”

– अभिषेक बारणे, स्थायी समिती सभापती, पिंपरी चिंचवड महापालिका.

 

Post Views: 12
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमावळमध्ये शेतीच्या बांधावरून वाद; शेतकऱ्याच्या हाताला दुखापत
Next Article महापौर रवी लांडगे यांना धमकी;आरोपीला काही तासांत ताब्यात
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?