Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»शैक्षणिक»यूपीएससी उत्तीर्ण कबीर कांबळे यांचा पत्रकारांकडून सत्कार
शैक्षणिक

यूपीएससी उत्तीर्ण कबीर कांबळे यांचा पत्रकारांकडून सत्कार

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comMay 17, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

देशाचे पर्यावरण आणि नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनासाठी काम करणार – कबीर कांबळे

पिंपरी : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत यश संपादन करून पिंपरी-चिंचवड शहराचे नाव उज्ज्वल करणारे कबीर राहुल कांबळे यांचा शहरातील पत्रकारांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यूपीएससी परीक्षेत १२५ वा क्रमांक मिळवत त्यांची भारतीय वनसेवा (IFS) साठी निवड झाली आहे.

महानगरपालिका इमारतीतील पत्रकार कक्षात आयोजित कार्यक्रमात कबीर कांबळे यांचे शाल, पुष्पगुच्छ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या पुस्तकाने स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्या आई-वडिलांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार नाना कांबळे, बाळासाहेब ढसाळ, संतलाल यादव, बाबू कांबळे, अविनाश कांबीकर, दादाराव आढाव, दिलीप देहाडे, भीमराव बरकडे, युनूस खतिब आदी पत्रकार उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ समाजसेवक मारुती भापकर आणि युवराज दखले यांनीही उपस्थित राहून कबीर कांबळे यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी पत्रकारांनी कबीर कांबळे यांच्या यशामागील अभ्यासपद्धती, कोचिंग आणि पुस्तकांविषयी माहिती जाणून घेतली. संतलाल यादव यांनी शहरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. तर मारुती भापकर, नाना कांबळे, युवराज दखले आणि बाळासाहेब ढसाळ यांनी गरीब, शोषित आणि वंचित घटकांसाठी काम करण्याचा सल्ला दिला.

आपले मनोगत व्यक्त करताना कबीर कांबळे म्हणाले की, दहावीत असताना तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या कार्यशैलीतून त्यांना यूपीएससीची प्रेरणा मिळाली. पहिल्या प्रयत्नात अपयश आले, मात्र दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी यश मिळवत १२५ वा क्रमांक पटकावला. त्यांनी कोणतेही क्लास न लावता दररोज सुमारे ११ तास अभ्यास केला. ‘द हिंदू’ या वृत्तपत्रातील संपादकीय लेख नियमित वाचल्याचा त्यांना मोठा फायदा झाला.

मुलाखतीतील अनुभव सांगताना त्यांनी वनविभागाशी संबंधित प्रश्न विचारण्यात आल्याचे नमूद केले. “देशात विकासकामांसाठी झाडांची तोड होत असली, तरी त्याऐवजी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड होणे आवश्यक आहे. पर्यावरण आणि नैसर्गिक संसाधनांच्या संरक्षणासाठी संविधानाने दिलेल्या अधिकारांचा प्रभावी वापर करून काम करण्याची माझी इच्छा आहे,” असे कबीर कांबळे यांनी सांगितले.

कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर मिळवलेल्या या यशामुळे पिंपरी-चिंचवड शहराचा अभिमान वाढला असून, कबीर कांबळे हे शहरातील तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleटाळगाव चिखलीतील टाऊन हॉलला ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज’ यांचे नाव
Next Article २० रुपयांच्या सीटसाठी जीव धोक्यात;वाहतूक विभाग मात्र ‘झोपेत’!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?