Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; पिंपरीचे महापौर सायकलवर,
पिंपरी चिंचवड

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; पिंपरीचे महापौर सायकलवर,

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comMay 15, 2026Updated:May 15, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

‘आठवड्यातून एक दिवस’चा निर्धार

पिंपरी दिं.१५ मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, पर्यावरण संवर्धन आणि साधेपणाचा संदेश देत लोकप्रतिनिधींना सायकल वापरण्याचे आवाहन केल्यानंतर त्याचे पडसाद आता पिंपरी-चिंचवड महापालिकेत उमटू लागले आहेत. मुख्यमंत्री स्तरावरील प्रतिसादानंतर आता पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांनीही गुरुवारी संपूर्ण दिवसाचे कामकाज सायकलवरून करत या आवाहनाला प्रतिसाद दिला. मात्र हा केवळ ‘एक दिवसाचा दिखावा’ राहू नये, यासाठी आठवड्यातून किमान एक दिवस सायकलवरूनच कामकाज करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

महापौर रवी लांडगे सकाळपासून विविध बैठका, पाहण्या आणि महापालिकेतील कामकाजासाठी सायकलवरून फिरताना दिसले. त्यांच्या या उपक्रमामुळे महापालिका परिसरात चर्चेला उधाण आले. वाढते प्रदूषण, वाहतूक कोंडी आणि इंधनावरील वाढती अवलंबित्व याच्या पार्श्वभूमीवर सायकल संस्कृतीला चालना देण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहितासाठी काटकसर आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश दिला आहे. केवळ एका दिवसापुरते सायकल चालवून फोटोसेशन करण्यापेक्षा त्याचे सातत्य महत्त्वाचे आहे. मी महापौरपदावर असेपर्यंत आठवड्यातून एक दिवस सायकलवरूनच कामकाज करणार आहे,” असे लांडगे यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत पूर्वी सुरू करण्यात आलेल्या, पण नंतर अक्षरशः बारगळलेल्या ‘शेअरिंग सायकल’ योजनेवरही भाष्य केले. शहरात मोठ्या गाजावाजात सुरू करण्यात आलेली ही योजना नियोजनाच्या अभावामुळे आणि देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने काही महिन्यांतच कोलमडली होती. अनेक ठिकाणी सायकल स्टँड ओस पडले, तर सायकलींची मोडतोड आणि चोरीच्या घटनाही समोर आल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर महापौरांनी आता ही योजना नव्याने आणि अधिक सक्षम पद्धतीने राबविण्याचे संकेत दिले. “स्मार्ट सिटीतील शेअरिंग सायकल योजना नव्याने सुरू करण्यात येईल. शहरातील प्रत्येक प्रमुख रस्त्यावर सायकल ट्रॅक उभारण्याचा प्रयत्न केला जाईल. नागरिकांनीही यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.

पिंपरी-चिंचवडसारख्या वेगाने वाढणाऱ्या आणि वाहनांच्या प्रचंड गर्दीने त्रस्त शहरात सायकल संस्कृतीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असला, तरी त्यासाठी केवळ प्रतीकात्मक उपक्रम नव्हे तर सातत्यपूर्ण धोरण आणि पायाभूत सुविधांची गरज असल्याचे मत पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

Post Views: 5
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleबैलगाडीतून महापालिकेत एन्ट्री
Next Article पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत महापौर रवि लांडगे यांचा सायकलने प्रवास
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?