Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत महापौर रवि लांडगे यांचा सायकलने प्रवास
पिंपरी चिंचवड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत महापौर रवि लांडगे यांचा सायकलने प्रवास

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comMay 15, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

इंधन बचत व पर्यावरणपूरक जीवनशैलीचा दिला नागरिकांना संदेश

पिंपरी, दि. १५ मे २०२६:  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांनी आज आपल्या निवासस्थानापासून महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीपर्यंत सायकलने प्रवास केला. यावेळी महापौर रवि लांडगे यांनी नागरिकांनाही शक्य तिथे सायकलचा वापर, सार्वजनिक वाहतूक आणि इंधन बचतीच्या सवयी अंगीकारण्याचे आवाहन केले.

आज सकाळी महापौर रवि लांडगे हे आपल्या निवासस्थानातून सायकलवरून महापालिकेकडे रवाना झाले. शहरातील प्रमुख मार्गांवरून सायकलने प्रवास करत त्यांनी नागरिकांना इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला. यावेळी महापालिकेचे सह शहर अभियंता बापू गायकवाड, उप अभियंता अमित दीक्षित, महापौरांचे स्वीय सहाय्यक अभय चौगुले, संदीप पालांडे हे देखील त्यांच्यासमवेत होते.

महापौर रवि लांडगे म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या इंधन बचत आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीच्या संदेशातून प्रेरणा घेत आजचा हा सायकल प्रवास करण्यात आला आहे. येथून पुढे आठवड्यातून एक दिवस सायकलने प्रवास करण्याचे नियोजन आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनीही दैनंदिन जीवनात सायकलचा वापर, सार्वजनिक वाहतूक आणि इंधन बचतीच्या सवयी अंगीकारून पर्यावरण रक्षणासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

सायकलचा वापर हा केवळ इंधन बचतीसाठी नाही, तर निरोगी जीवनशैली, स्वच्छ हवा आणि पर्यावरण संवर्धनासाठीही महत्त्वाचा आहे. इंधन बचत हीच खरी राष्ट्रसेवा असून, पर्यावरणाचे संरक्षण आणि पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित भविष्य घडवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात छोटे-छोटे सकारात्मक बदल करणे आवश्यक आहे. पर्यावरणपूरक पिंपरी चिंचवड घडविण्यासाठी प्रत्येकाने छोट्या-छोट्या सवयींमधून योगदान देण्याची गरज आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका हरित उपक्रम, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी विविध मोहिमा राबवत असून, नागरिकांनीही या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन देखील यावेळी महापौर रवि लांडगे यांनी केले.

Post Views: 6
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; पिंपरीचे महापौर सायकलवर,
Next Article ज्येष्ठ तबलावादक धोंडीराम सायकर यांचा महापालिकेकडून मानपत्र देऊन सन्मान
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?