Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

November 22, 2026

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»मटण दुकानांमध्ये मटणाचे प्रदर्शन न करताच विक्री व्हावी; यावर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी — अभिषेक बारणे
पिंपरी चिंचवड

मटण दुकानांमध्ये मटणाचे प्रदर्शन न करताच विक्री व्हावी; यावर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी — अभिषेक बारणे

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 20, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

आठ दिवसांत अहवाल सादर करून स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्याचे निर्देश;प्रभाग कार्यालयांतील कामकाज आणि मूलभूत सुविधांबाबतही प्रशासनाला धारेवर धरले

पिंपरी-चिंचवड :- शहरातील सर्व मटण दुकानांमध्ये मटणाचे उघड्यावर प्रदर्शन न करता, समोरून योग्य आच्छादन किंवा पडदे लावून आतल्या पद्धतीनेच मटणाची विक्री व्हावी, अशी स्पष्ट व ठाम भूमिका स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडली. या संदर्भातील सविस्तर अहवाल पुढील आठ दिवसांत सादर करून तो स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी आणला जाईल, तसेच प्रशासनाने यावर तातडीने कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

महापालिका सर्वसाधारण सभेत शहरातील नागरी प्रश्न, स्वच्छता आणि प्रशासकीय कामकाजावर बोलताना बारणे यांनी विविध मुद्द्यांकडे सभागृहाचे आणि प्रशासनाचे लक्ष वेधले.

शहरातील मुख्य रस्ते आणि बाजारपेठांलगतच्या मटण दुकानांसमोर उघड्यावर होणाऱ्या प्रदर्शनामुळे नागरिकांना होणारा त्रास आणि स्वच्छतेचा प्रश्न लक्षात घेता, सर्व दुकानांवर समोरून आच्छादन लावून आतल्या आत व्यवहार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. या विषयावर पुढील आठ दिवसांत प्रशासनाकडून अहवाल मागवून तो स्थायी समितीपुढे अंतिम मान्यतेसाठी ठेवला जाईल. त्यामुळे संबंधित विभागाने कोणताही विलंब न लावता तत्काळ कार्यवाही सुरू करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

केवळ मटण दुकानांचाच विषय नव्हे, तर संपूर्ण शहराची स्वच्छता, सुंदरता आणि राहण्यायोग्य वातावरण टिकवून ठेवण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी या दोन चाकांनी समन्वयाने चालणे आवश्यक असल्याचे बारणे यांनी अधोरेखित केले. गेल्या दहा-पंधरा दिवसांत पाच-सहा प्रभागांतील क्षेत्रीय कार्यालयांना दिलेल्या भेटींचा संदर्भ देत त्यांनी प्रशासकीय पातळीवरील समन्वयाच्या अभावावर बोट ठेवले. प्रत्येक प्रभागात एक उपअभियंता आणि त्यांच्याअंतर्गत तीन कनिष्ठ अभियंते कार्यरत असताना, त्यांनी संबंधित नगरसेवकांसोबत दर आठवड्याला एकत्र बसून रुग्णालय, प्रशासकीय इमारती, उद्याने, क्रीडांगणे, रस्ते आणि पदपथांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, अशी सूचना त्यांनी केली.

अर्थसंकल्प पुस्तिकेत देखभाल-दुरुस्तीच्या आसपासची सुमारे सातशे कामे समाविष्ट असताना, त्यापैकी केवळ साडेतीनशे ते चारशे कामेच आता प्रसिद्ध झाल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणली. देखभाल-दुरुस्ती आणि वसुलीची कामे नियमितपणे होणे आवश्यक असून, साप्ताहिक बैठकीत दिलेल्या सूचना खालच्या स्तरापर्यंत योग्य प्रकारे पाळल्या जातात की नाही, याची खात्री प्रशासनाने घ्यावी, असेही त्यांनी सुचवले. नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुव्यवस्थित शहर देण्यासाठी मटण विक्रीच्या नियमांपासून ते प्रभाग स्तरावरील मूलभूत सुविधांपर्यंत प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.

“शहरातील स्वच्छता, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सोयीसाठी सर्व मटण दुकानांमध्ये उघड्यावर प्रदर्शन न करता, समोरून आच्छादन लावून आतल्या पद्धतीनेच विक्री व्हायला हवी, अशी आमची ठाम भूमिका आहे. याबाबत पुढील आठ दिवसांत याचा अहवाल स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी सादर केला जाईल. प्रशासनाने यावर तातडीने कारवाई करावी, तसेच प्रभाग स्तरावरील देखभाल-दुरुस्ती, मूलभूत सुविधा आणि मोशी कचरा व पाणीपुरवठ्याच्या नियोजनाबाबतही स्पष्ट व जबाबदारीने पावले उचलावीत. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या दोन चाकांनी समन्वयाने काम केल्यास शहराचा कारभार अधिक गतिमान आणि नागरिकाभिमुख होईल.” 

— अभिषेक बारणे, स्थायी समिती सभापती

Post Views: 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleराजकीय दबाव आणाल तर नाव आणि फोटो जाहीर करणार!पुण्यात अतिक्रमणांविरोधात महापालिकेचा बुलडोझर ॲक्शन मोड!
Next Article अजमेरा सोसायटी रोड, नेहरूनगरमध्ये महापालिकेचा बुलडोझर!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

रुपये १,२४६ कोटींचे कर्ज कशासाठी? मनसेचा महापालिका प्रशासनाला सवाल!

November 21, 2026

जगाला शांतता आणि विवेकाची नितांत गरज! – डाॅ. श्रीपाल सबनीस

November 21, 2026

आशियाई स्तरावर महोत्सव व्हावा – रंगानुभूति महोत्सव ही शहराची ओळख व्हावी – डॉ. विजय सूर्यवंशी

November 21, 2026

वाय.सी.एम. औषध प्रकरणात महापालिकेची बाजू; १.७२ कोटींच्या जप्तीचे वृत्त फेटाळले

November 20, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 22, 20260

पत्र्याच्या शेडमध्ये प्रवेश करून स्टेनलेस स्टील, तांबे, पितळ, अॅल्युमिनियमसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरट्यांनी पळविला भोसरी प्रतिनिधी:…

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026

नेरलेतील दोन तरुणांना मारहाण प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाची गंभीर दखल

November 22, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?