Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

November 22, 2026

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट; ठेकेदारांसाठी ७५ कोटींची उधळपट्टी कशाला?
पिंपरी चिंचवड

महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट; ठेकेदारांसाठी ७५ कोटींची उधळपट्टी कशाला?

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 19, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असताना उधळपट्टी कशासाठी? मारुती भापकर यांचा महापौर व आयुक्तांना सवाल

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असताना आणि विकासकामांची ठेकेदारांची तब्बल चार हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेची बिले प्रलंबित असताना, महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत प्रस्तावित करण्यात आलेली ७५ कोटी रुपयांची ‘बाळंतविडा’ योजना तातडीने रद्द करावी, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती साहेबराव भापकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापौर रवी लांडगे आणि महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन दिले आहे.

महापालिकेच्या या योजनेअंतर्गत ३६ हजार मातांना पौष्टिक खाऊ आणि १७ हजार नवजात मुलींना बाळंतविडा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी एका वर्षाला २५ कोटी रुपये, तर तीन वर्षांसाठी तब्बल ७५ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आल्याचे भापकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.

राज्य सरकारमार्फत अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून गर्भवती मातांना पोषण आहार तसेच बालकांसाठी आवश्यक साहित्याच्या योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. अशा परिस्थितीत महापालिकेने पुन्हा त्याच स्वरूपाची योजना राबविण्याची गरज काय? शासनाकडून सर्वत्र थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) धोरण राबविले जात असताना, महापालिकेने ठेकेदारांमार्फत वस्तू खरेदी करण्याचा अट्टहास का धरला आहे, असा सवाल भापकर यांनी उपस्थित केला आहे.

एकीकडे महापालिका कर्ज उभारणीच्या प्रयत्नात आहे, दुसरीकडे विकासकामे पूर्ण केलेल्या ठेकेदारांची कोट्यवधी रुपयांची देयके प्रलंबित आहेत. शहराच्या विकासासाठी निधीची चणचण भासत असताना आणि काटकसरीचे धोरण स्वीकारण्याची गरज असताना अशा प्रकारे कोट्यवधी रुपयांची योजना राबविणे आर्थिकदृष्ट्या अयोग्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

‘महापालिकेच्या तिजोरीवर आर्थिक ताण असताना ठेकेदारांच्या फायद्यासाठी अशा योजनांची खैरात कशासाठी?’ असा संतप्त सवाल उपस्थित करत, प्रस्तावित ७५ कोटींच्या बाळंतविडा योजनेची निविदा तातडीने रद्द करावी, अशी मागणी मारुती भापकर यांनी केली आहे.

Post Views: 5
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article‘लाडक्या बहिणीं’च्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – मंत्री अदिती तटकरे
Next Article पवना जलवाहिनी प्रकल्पातील २०० कोटींच्या खर्चाची जबाबदारी कोणाची?
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

रुपये १,२४६ कोटींचे कर्ज कशासाठी? मनसेचा महापालिका प्रशासनाला सवाल!

November 21, 2026

जगाला शांतता आणि विवेकाची नितांत गरज! – डाॅ. श्रीपाल सबनीस

November 21, 2026

आशियाई स्तरावर महोत्सव व्हावा – रंगानुभूति महोत्सव ही शहराची ओळख व्हावी – डॉ. विजय सूर्यवंशी

November 21, 2026

वाय.सी.एम. औषध प्रकरणात महापालिकेची बाजू; १.७२ कोटींच्या जप्तीचे वृत्त फेटाळले

November 20, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 22, 20260

पत्र्याच्या शेडमध्ये प्रवेश करून स्टेनलेस स्टील, तांबे, पितळ, अॅल्युमिनियमसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरट्यांनी पळविला भोसरी प्रतिनिधी:…

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026

नेरलेतील दोन तरुणांना मारहाण प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाची गंभीर दखल

November 22, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?