Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

November 22, 2026

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पवना जलवाहिनी प्रकल्पातील २०० कोटींच्या खर्चाची जबाबदारी कोणाची?
पिंपरी चिंचवड

पवना जलवाहिनी प्रकल्पातील २०० कोटींच्या खर्चाची जबाबदारी कोणाची?

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 19, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

तत्कालीन अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांकडून रक्कम वसूल करा; मारुती भापकर यांची आयुक्त व महापौरांकडे मागणी

पिंपरी प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पवना थेट जलवाहिनी प्रकल्पासाठी आतापर्यंत खर्च करण्यात आलेले सुमारे २०० कोटी रुपये वाया गेल्याचा आरोप करत, या आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करून संबंधित तत्कालीन अधिकारी आणि स्थायी समितीच्या सभापती व सदस्यांकडून ही रक्कम वसूल करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती साहेबराव भापकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि महापौर रवी लांडगे यांना १९ नोव्हेंबर रोजी निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेने सन २००७-०८ मध्ये पवना थेट जलवाहिनी प्रकल्पाला मंजुरी दिली होती. प्रकल्पासाठी आवश्यक जागा ताब्यात नसतानाही तब्बल ३९० कोटी रुपयांची निविदा काढून कामाचे आदेश देण्यात आले. मात्र, या प्रकल्पाला विरोध झाल्याने मोठे आंदोलन उभे राहिले. त्यानंतर तत्कालीन राज्य सरकारने या प्रकल्पाच्या कामाला स्थगिती दिली.

प्रकल्पाला स्थगिती मिळेपर्यंत संबंधित ठेकेदाराला महापालिकेकडून सुमारे २०० कोटी रुपये अदा करण्यात आल्याचा दावा भापकर यांनी केला आहे. विशेष म्हणजे, आता संबंधित ठेकेदाराने ४९६ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईच्या मागणीसाठी महापालिकेविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर आणखी आर्थिक भार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नियोजनातील त्रुटींचा आर्थिक भार नागरिकांनी का सोसायचा?

प्रकल्पासाठी जागा उपलब्ध नसताना निविदा प्रक्रिया राबविणे, कामाचे आदेश देणे आणि त्यानंतर प्रकल्प रखडल्याने महापालिकेचे कोट्यवधी रुपये खर्च होणे, या संपूर्ण प्रक्रियेची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. या निर्णय प्रक्रियेत सहभागी असलेल्या तत्कालीन अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून, दोष सिद्ध झाल्यास त्यांच्याकडून महापालिकेचे आर्थिक नुकसान वसूल करण्याची कारवाई करावी, अशी मागणी भापकर यांनी केली आहे.

महापालिकेचा पैसा हा सर्वसामान्य करदात्यांचा आहे. त्यामुळे चुकीच्या नियोजनामुळे किंवा निर्णय प्रक्रियेतील त्रुटींमुळे झालेल्या आर्थिक नुकसानीचा भार नागरिकांवर टाकण्याऐवजी जबाबदार व्यक्तींची उत्तरदायित्व निश्चित करावे, अशी भूमिका त्यांनी निवेदनातून मांडली आहे.

आयुक्त आणि महापौरांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून चौकशीचे आदेश द्यावेत, तसेच सुमारे २०० कोटी रुपयांच्या वसुलीसाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी मारुती भापकर यांनी केली आहे.

 

Post Views: 6
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहापालिकेच्या तिजोरीत खडखडाट; ठेकेदारांसाठी ७५ कोटींची उधळपट्टी कशाला?
Next Article शिरगाव येथील श्री साईबाबा ट्रस्ट मधील भ्रष्टाचारी विश्वस्तांवर कारवाई करा – उस्मान शेख
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

रुपये १,२४६ कोटींचे कर्ज कशासाठी? मनसेचा महापालिका प्रशासनाला सवाल!

November 21, 2026

जगाला शांतता आणि विवेकाची नितांत गरज! – डाॅ. श्रीपाल सबनीस

November 21, 2026

आशियाई स्तरावर महोत्सव व्हावा – रंगानुभूति महोत्सव ही शहराची ओळख व्हावी – डॉ. विजय सूर्यवंशी

November 21, 2026

वाय.सी.एम. औषध प्रकरणात महापालिकेची बाजू; १.७२ कोटींच्या जप्तीचे वृत्त फेटाळले

November 20, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 22, 20260

पत्र्याच्या शेडमध्ये प्रवेश करून स्टेनलेस स्टील, तांबे, पितळ, अॅल्युमिनियमसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरट्यांनी पळविला भोसरी प्रतिनिधी:…

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026

नेरलेतील दोन तरुणांना मारहाण प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाची गंभीर दखल

November 22, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?