Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

November 22, 2026

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»औद्योगिक नगरी म्हणून नावाजलेली पिंपरी-चिंचवडची आता जागतिक क्रीडा नकाशावरही छाप
पिंपरी चिंचवड

औद्योगिक नगरी म्हणून नावाजलेली पिंपरी-चिंचवडची आता जागतिक क्रीडा नकाशावरही छाप

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 19, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

१० जानेवारी २०२६ रोजी ‘पीसीएमसी ग्रँड मॅरेथॉन’चे आयोजन

पिंपरी, दि. १९ नोव्हेंबर २०२६ : – औद्योगिक नगरी म्हणून देशभरात ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराला आता क्रीडा क्षेत्रातही जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने येत्या १० जानेवारी २०२७ रोजी ‘पीसीएमसी ग्रँड मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात येणार आहे. या मॅरेथॉनमध्ये ४२ किलोमीटर फुल मॅरेथॉन, २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉन, १० किलोमीटर आणि ५ किलोमीटर अशा विविध गटांचा समावेश असणार आहे. नागरिकांमध्ये आरोग्य आणि फिटनेसविषयी जागरूकता निर्माण करण्यासोबतच स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धावपटूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

मॅरेथॉनच्या आयोजनासाठी अशा स्पर्धांचा अनुभव असलेल्या संस्थेची मदत घेतली जाणार असून, स्पर्धेची नोंदणी आणि अन्य व्यवस्थापन आंतरराष्ट्रीय मानकांनुसार करण्यात येणार आहे. तसेच ‘पीसीएमसी ग्रँड मॅरेथॉन’चा समावेश जागतिक मॅरेथॉन कॅलेंडरमध्ये व्हावा, यासाठीही विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.

“पिंपरी-चिंचवड शहराची ओळख आजवर औद्योगिक क्षेत्रातील प्रगतीमुळे देशभरात निर्माण झाली आहे. आता क्रीडा क्षेत्रातही शहराला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पीसीएमसी ग्रँड मॅरेथॉनच्या माध्यमातून शहरातील तरुणाई आणि नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैलीची प्रेरणा मिळेल. देश-विदेशातील धावपटूंना आकर्षित करणारी ही स्पर्धा शहराच्या लौकिकात भर घालणारी ठरेल. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा.”

….. रवी लांडगे,महापौर,पिंपरी चिंचवड 

“पीसीएमसी ग्रँड मॅरेथॉनचे आयोजन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नियोजनानुसार करण्यात येणार आहे. ४२, २१, १० आणि ५ किलोमीटर अशा विविध गटांमुळे सर्व वयोगटांतील धावपटूंना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेचा जागतिक मॅरेथॉन कॅलेंडरमध्ये समावेश व्हावा, यासाठी आवश्यक प्रयत्न केले जातील. शहरात क्रीडा संस्कृती रुजविणे, नागरिकांचे आरोग्य उत्तम राखणे आणि पिंपरी-चिंचवडला आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात ओळख मिळवून देणे हा या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे.”

……आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी पिंपरी चिंचवड महानगरपालिका 

या कार्यक्रमाचे अनुषंगाने महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डाॅ.विजय सुर्यवंशी यांची पत्रकार परिषद आज घेण्यात आली होती,या परिषदेस उपमहापौर शर्मिला बाबर,विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर,शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे,क्रीडा समिती सभापती कैलास कुटे,क्रिडा समिती सदस्य योगेश लांडगे,धर्मपाल तंतरपाळे,शाम जगताप,तानाजी बारणे, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम,उप आयुक्त अण्णा बोदडे, पंकज पाटील,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

मॅरेथॉनचा मार्ग : डी. वाय. पाटील मैदान – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक – भक्ती-शक्ती चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक – टेल्को रोड – इंद्रायणीनगर – एम्पायर इस्टेट ब्रिज – काळेवाडी चौक – डांगे चौक – संत तुकाराम ब्रिज – रावेत – कॅन्टोन्मेंट – डी. वाय. पाटील मैदान.मॅरेथॉनसाठी इच्छुक धावपटूंना indiarunning.com या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे.

औद्योगिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या पिंपरी-चिंचवड शहराच्या क्रीडा क्षेत्रातील वाटचालीला या मॅरेथॉनमुळे नवी दिशा मिळणार असल्याचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले.

तर या उपक्रमाच्या माध्यमातून शहरात धावण्याची आणि क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन मिळण्यासोबतच देश-विदेशातील धावपटू, क्रीडाप्रेमी आणि पर्यटकांना शहराकडे आकर्षित करण्याची संधी निर्माण होणार असल्याचे मत अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी व्यक्त केले.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमोशीतील ३७ एकर आरक्षणावर संस्थेचा डोळा? भापकरांचा प्रस्तावाला विरोध!
Next Article ‘लाडक्या बहिणीं’च्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – मंत्री अदिती तटकरे
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

रुपये १,२४६ कोटींचे कर्ज कशासाठी? मनसेचा महापालिका प्रशासनाला सवाल!

November 21, 2026

जगाला शांतता आणि विवेकाची नितांत गरज! – डाॅ. श्रीपाल सबनीस

November 21, 2026

आशियाई स्तरावर महोत्सव व्हावा – रंगानुभूति महोत्सव ही शहराची ओळख व्हावी – डॉ. विजय सूर्यवंशी

November 21, 2026

वाय.सी.एम. औषध प्रकरणात महापालिकेची बाजू; १.७२ कोटींच्या जप्तीचे वृत्त फेटाळले

November 20, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 22, 20260

पत्र्याच्या शेडमध्ये प्रवेश करून स्टेनलेस स्टील, तांबे, पितळ, अॅल्युमिनियमसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरट्यांनी पळविला भोसरी प्रतिनिधी:…

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026

नेरलेतील दोन तरुणांना मारहाण प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाची गंभीर दखल

November 22, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?