Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

November 22, 2026

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»भटक्या श्वानांच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करा……उपमहापौर शर्मिला बाबर
पिंपरी चिंचवड

भटक्या श्वानांच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करा……उपमहापौर शर्मिला बाबर

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 18, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

श्वान निवारा केंद्राची पाहणी; लसीकरण, नसबंदी आणि आक्रमक श्वानांच्या व्यवस्थापनासाठी प्रभावी कार्यवाही करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

पिंपरी, १८ नोव्हेंबर २०२६ : शहरातील भटक्या श्वानांमुळे नागरिकांना होणारा त्रास आणि सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता उपमहापौर शर्मिला बाबर यांनी गवळीमाथा रोड, पिंपरी येथील श्वान निवारा केंद्र आणि पशु इस्पितळाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी निवारा केंद्रातील व्यवस्था, श्वानांचे लसीकरण व नसबंदी, तसेच नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत भटक्या श्वानांच्या समस्येवर तातडीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

शहरातील विविध भागांतून भटक्या श्वानांच्या त्रासाबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. यापूर्वी घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी संभाव्य समस्याग्रस्त भागांची ओळख करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर भर देण्याची गरज असल्याचे उपमहापौर बाबर यांनी यावेळी स्पष्ट केले.

लसीकरण, नसबंदी आणि आक्रमक श्वानांच्या व्यवस्थापनासाठी सूचना

पाहणीदरम्यान श्वानांची संख्या, लसीकरण व नसबंदीची सद्यस्थिती, श्वान पकडण्यासाठी उपलब्ध पथके, मनुष्यबळ आणि साधनसामग्री याबाबत त्यांनी माहिती घेतली. लसीकरण व नसबंदीच्या कामाला गती देऊन ते नियमितपणे सुरू ठेवावे, तसेच चावणाऱ्या किंवा आक्रमक श्वानांबाबत तक्रार प्राप्त झाल्यास २४ तासांच्या आत आवश्यक कार्यवाही करून त्यांना नियमानुसार सुरक्षितपणे वेगळे ठेवण्याची व्यवस्था करावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. वारंवार तक्रारी येणाऱ्या भागांत प्राधान्याने कार्यवाही करावी आणि आवश्यकतेनुसार पथकांची संख्या व साधनसामग्री वाढवावी, असेही त्यांनी सांगितले. यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजातील अडचणीही त्यांनी जाणून घेतल्या. या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करून त्यावर तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

श्वान निवारा केंद्रातील व्यवस्थेची पाहणी

नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची असली तरी श्वान निवारा केंद्रात आणलेल्या श्वानांची योग्य काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे, श्वानांना वेळेवर अन्न व स्वच्छ पाणी, आवश्यक औषधोपचार आणि लसीकरण मिळत आहे का, तसेच केंद्रातील स्वच्छता आणि आरोग्यविषयक सुविधा योग्य आहेत का, याची देखील त्यांनी पाहणी केली. केंद्रातील व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी डॉक्टर, औषधे, पाणी, स्वच्छता किंवा अन्य आवश्यक सुविधांची कमतरता असल्यास ती निदर्शनास आणून द्यावी, जेणेकरून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करता येईल, असेही त्यांनी सांगितले.

नागरिकांची सुरक्षितता आणि प्राण्यांची काळजी या दोन्ही गोष्टींना प्राधान्य

शहरातील नागरिकांना रस्त्यावरून निर्भयपणे वावरता आले पाहिजे. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही हलगर्जीपणा होता कामा नये. त्याचवेळी मुक्या प्राण्यांशी माणुसकीने वागत त्यांच्या आरोग्याची आणि देखभालीची योग्य व्यवस्था करणेही आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांची सुरक्षा आणि श्वानांची काळजी या दोन्ही बाबींचा समतोल राखून प्रभावी कार्यवाही करावी, असे देखील उपमहापौर बाबर यांनी सांगितले.

यावेळी उपमहापौर बाबर यांनी नागरिकांना आवाहन केले की, भटक्या श्वानांबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार किंवा समस्या असल्यास नागरिकांनी *८७८८०७०६६५* या क्रमांकावर संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी. प्राप्त तक्रारींची दखल घेऊन संबंधित विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.

या पाहणीप्रसंगी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांच्यासह पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी, डॉक्टर्स आणि कर्मचारी उपस्थित होते.

Post Views: 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी-चिंचवड, चाकण परिसरात गुन्हेगारी घटनांचा धुमाकूळ; खूनाचा प्रयत्न, मारहाण, अपघातात मृत्यू अन् १५.४० कोटींच्या अपहाराचा गुन्हा!
Next Article अखेर प्रतीक्षा संपणार! पिंपरी-चिंचवड मनपातील १० स्वीकृत नगरसेवकांची निवड २० नोव्हेंबरला!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

रुपये १,२४६ कोटींचे कर्ज कशासाठी? मनसेचा महापालिका प्रशासनाला सवाल!

November 21, 2026

जगाला शांतता आणि विवेकाची नितांत गरज! – डाॅ. श्रीपाल सबनीस

November 21, 2026

आशियाई स्तरावर महोत्सव व्हावा – रंगानुभूति महोत्सव ही शहराची ओळख व्हावी – डॉ. विजय सूर्यवंशी

November 21, 2026

वाय.सी.एम. औषध प्रकरणात महापालिकेची बाजू; १.७२ कोटींच्या जप्तीचे वृत्त फेटाळले

November 20, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 22, 20260

पत्र्याच्या शेडमध्ये प्रवेश करून स्टेनलेस स्टील, तांबे, पितळ, अॅल्युमिनियमसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरट्यांनी पळविला भोसरी प्रतिनिधी:…

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026

नेरलेतील दोन तरुणांना मारहाण प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाची गंभीर दखल

November 22, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?