Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

November 22, 2026

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»अखेर प्रतीक्षा संपणार! पिंपरी-चिंचवड मनपातील १० स्वीकृत नगरसेवकांची निवड २० नोव्हेंबरला!
पिंपरी चिंचवड

अखेर प्रतीक्षा संपणार! पिंपरी-चिंचवड मनपातील १० स्वीकृत नगरसेवकांची निवड २० नोव्हेंबरला!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 18, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

साडेआठ महिन्यांनंतर निवडीचा मुहूर्त; भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी दिला दुजोरा

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील बहुप्रतीक्षित १० स्वीकृत नगरसेवकांची निवड अखेर साडेआठ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर होणार आहे. येत्या २० नोव्हेंबर २०२६ रोजी ही निवड प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी दिली आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छुक असलेल्या राजकीय कार्यकर्त्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.

महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या दहा जागांसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून राजकीय पक्षांमध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत. विशेषतः भाजपमध्ये या पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने पक्षांतर्गत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. पक्षासाठी वर्षानुवर्षे निष्ठेने काम करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार की इतर पक्षांतून भाजपमध्ये आलेल्या आयारामांना प्राधान्य दिले जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

स्वीकृत नगरसेवकपद हे केवळ सन्मानाचे पद नसून महापालिकेच्या सभागृहात शहराच्या प्रश्नांवर भूमिका मांडण्याची महत्त्वाची संधी आहे. त्यामुळे या दहा जागांवर कोणाची वर्णी लागणार, याकडे इच्छुकांसह शहरातील राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

निष्ठावंतांना न्याय की आयारामांना संधी?

भाजपमध्ये अनेक वर्षांपासून संघटनात्मक काम करणारे कार्यकर्ते स्वीकृत नगरसेवकपदासाठी संधीच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे, आगामी राजकीय समीकरणे आणि पक्षीय ताकद लक्षात घेऊन नव्याने पक्षात आलेल्या नेत्यांनाही संधी दिली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे अंतिम निवड करताना पक्षश्रेष्ठी कोणता निकष लावतात, हे २० नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे.

एकूणच, साडेआठ महिन्यांपासून रखडलेल्या स्वीकृत नगरसेवक निवडीला अखेर मुहूर्त मिळाल्याने पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता दहा भाग्यवान कोण, याचीच उत्सुकता सर्वांना लागली आहे!

Post Views: 6
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleभटक्या श्वानांच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करा……उपमहापौर शर्मिला बाबर
Next Article संविधान दिनी पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्यांदाच भव्य ‘संविधान सन्मान दौड’!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

रुपये १,२४६ कोटींचे कर्ज कशासाठी? मनसेचा महापालिका प्रशासनाला सवाल!

November 21, 2026

जगाला शांतता आणि विवेकाची नितांत गरज! – डाॅ. श्रीपाल सबनीस

November 21, 2026

आशियाई स्तरावर महोत्सव व्हावा – रंगानुभूति महोत्सव ही शहराची ओळख व्हावी – डॉ. विजय सूर्यवंशी

November 21, 2026

वाय.सी.एम. औषध प्रकरणात महापालिकेची बाजू; १.७२ कोटींच्या जप्तीचे वृत्त फेटाळले

November 20, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 22, 20260

पत्र्याच्या शेडमध्ये प्रवेश करून स्टेनलेस स्टील, तांबे, पितळ, अॅल्युमिनियमसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरट्यांनी पळविला भोसरी प्रतिनिधी:…

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026

नेरलेतील दोन तरुणांना मारहाण प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाची गंभीर दखल

November 22, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?