आकुर्डीत ‘आपला म्युझिकल ग्रुप’चा ५० वा संगीत सोहळा दिमाखात; पत्रकार, कलाकार व पर्यावरणप्रेमींचा पुरस्कार देऊन सन्मान
आकुर्डी प्रतिनिधी : संगीताचा निनाद, कलाकारांचा बहारदार आविष्कार आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा सन्मान अशा उत्साही वातावरणात ‘आपला म्युझिकल ग्रुप’चा ५० वा संगीत सोहळा आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात दिमाखात पार पडला. संगीतप्रेमी रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने रंगलेल्या या सोहळ्यात पत्रकारिता, कला आणि पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन अनिल घाडगे यांनी केले होते. सहआयोजक विजय कांबळे, रणजीत पाटील, विद्या हजारे आणि सुषमा वनारसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा संगीत सोहळा उत्साहात संपन्न झाला.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर शर्मिलाताई बाबर, नगरसेविका योगिताताई नागरगोजे आणि नगरसेवक तुषार सहाणे यांच्या हस्ते पत्रकार पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी श्रावण जाधव (सकाळ), अमोल काकडे (पुण्यनगरी), बापूसाहेब गोरे (माझा आवाज), सूरज साळवे (लोकन्याय न्यूज), शबनम सय्यद (शबनम न्यूज), माधुरी कोराड (अध्यक्षा, पिंपरी-चिंचवड महिला पत्रकार संघ), अनिल कातळे (वेध न्यूज) आणि श्रीधर जगताप (प्रभाकर न्यूज) यांना पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पर्यावरण क्षेत्रातील योगदानाबद्दल विठ्ठल नाना वाळुंज यांना पर्यावरण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
चित्रपट अभिनेत्री आर्या घारे, दैवशाला घाडगे, आयुब खान आणि अनिल गायकवाड यांना ‘पुणेरी कलारत्न पुरस्कार’, तर शशिकांत वाडते आणि सीमा पोडाला यांना कलाकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सुरेल गाण्यांनी रसिक मंत्रमुग्ध
कार्यक्रमातील संगीत मैफलीत अनिल घाडगे, रणजीत पाटील, विजय कांबळे, संजय मिश्रा, प्रसाद माने, दत्ता लोहार, विकास जगताप, मोहन भस्मे, के. संग्राम, नेहा दंडवते, विद्या हजारे, सुषमा वनारसे, शुभांगी पवार, मंगल लोहर, छाया अय्यर, संगीता खरवडे, विद्या कोकणे आणि सीमा पोडाला या गायक-गायिकांनी आपल्या सुमधुर आवाजाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. बालकलाकार दुर्वेश घाडगे, काव्या वडतकर आणि प्रीता पाखरे यांच्या नृत्याविष्काराने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवली.
कार्यक्रमाच्या पूर्वार्धाचे सूत्रसंचालन सीमा सुतार यांनी केले, तर पुरस्कार वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन आणि कार्यक्रमाची सांगता नेहा दंडवते यांनी केली.
नाट्यगृहाच्या समस्यांकडे वेधले लक्ष
या कार्यक्रमादरम्यान ग. दि. माडगूळकर नाट्यगृहातील विविध अडचणी आणि सुविधांबाबत आयोजकांनी उपमहापौर शर्मिलाताई बाबर व नगरसेवकांसमोर काही मागण्या मांडल्या. त्यावर उपमहापौर बाबर यांनी या मागण्या पूर्ण करण्यासाठी सकारात्मक आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनिल जगताप, उमाकांत पवार, शिवानंद मगदूम, अजिंक्य पोटे, अनिल बिरादार, मुबारक पानसरे आणि अनिल सौंदडे यांनी विशेष परिश्रम घेतले. साऊंड व्यवस्था महेश, व्हिडिओ चित्रीकरण शीला लाहिगुडे आणि फोटोग्राफी दत्ता लोहार यांनी सांभाळली.
विशेष म्हणजे, पूर्णपणे विनामूल्य प्रवेश असलेल्या या कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. संगीताच्या माध्यमातून कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध उपलब्ध करून देतानाच समाजासाठी योगदान देणाऱ्या पत्रकार आणि मान्यवरांचा गौरव करण्याचा स्तुत्य उपक्रम ‘आपला म्युझिकल ग्रुप’ने राबविला. ५० व्या कार्यक्रमाच्या यशस्वितेनंतर आगामी संगीत कार्यक्रम अधिक भव्य स्वरूपात आयोजित करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.
