Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

November 22, 2026

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»सिमकार्डचा काळाबाजार ते आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेट; दुबई कनेक्शन उघड
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

सिमकार्डचा काळाबाजार ते आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेट; दुबई कनेक्शन उघड

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 17, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची मोठी कारवाई; सात आरोपी अटकेत, मुख्य सूत्रधार दुबईतून डिपोर्ट

पिंपरी-चिंचवड : देशभरातील नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करण्यासाठी दुबईतून सायबर गुन्ह्यांचे जाळे चालविणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सायबर फसवणुकीसाठी दुबईत तब्बल १० ते १२ हजार मोबाईल सिमकार्ड पुरविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली असून, मुख्य सूत्रधाराला इंटरपोलच्या माध्यमातून भारतात आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

पिंपरी-चिंचवडसह देशभरात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या गुन्ह्यांमध्ये परदेशातून बनावट बँक खाती आणि मोबाईल सिमकार्डचा वापर केला जात असल्याचे तपासात समोर आले होते. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी अशा टोळ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

सायबर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. सुरुवातीला तुषार अमराराम चौधरी (वय २९, रा. चिखली) आणि आदर्श संतोष वाघमारे (वय २७, रा. आकुर्डी) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडील चौकशीत सुमंत ऊर्फ नानू रविंद्र दसरे (वय २६, रा. निगडी प्राधिकरण) हा मुख्य आरोपी असून, तो दुबईत राहून सायबर फसवणुकीचे गुन्हे करीत असल्याचे उघड झाले.

पोलिसांनी पाठपुरावा करून लूकआऊट सर्क्युलर (LOC) आणि इंटरपोलच्या मदतीने त्याला भारतात डिपोर्ट केले. त्यानंतर मुंबई विमानतळावरून त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. तपासात तो चीनमधील एका नागरिकाच्या साथीने सायबर फसवणुकीचे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले.

ग्राहकांच्या नावावर सिमकार्ड; ओटीपीचे कारण सांगून परस्पर विक्री!

या टोळीला सायबर गुन्ह्यांसाठी लागणारे १० ते १२ हजार सिमकार्ड भारतातून मनिष अशोकलाल वाधवा (वय ४४, रा. अंबरनाथ) आणि महेश कन्हैयालाल चौइथरामानी (वय ६०, रा. कल्याण) यांनी पुरविल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दोघांना अटक केली.

या दोघांनी सुरज मुन्नालाल चिकवा (वय ३२, रा. विक्रोळी, मुंबई; मूळ उत्तर प्रदेश) आणि राजा अशोक कुमार (वय ३१, रा. ठाणे; मूळ बिहार) यांच्याकडून सिमकार्ड मिळविल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे, हे आरोपी मोबाईल कंपन्यांमध्ये सिमकार्ड विक्रीचे काम करीत होते. ग्राहकांच्या नावाने सिमकार्ड घेतल्यानंतर ओटीपी एक्सपायर झाला किंवा सर्व्हर नसल्याने सिमकार्ड ॲक्टिव्ह झाले नाही, अशी खोटी कारणे सांगून ग्राहकांना सिमकार्ड न देता ती सिमकार्ड या टोळीला पुरविली जात होती. त्याबदल्यात आरोपी आर्थिक मोबदला घेत होते.

सायबर फसवणुकीसाठी बहुउद्देशीय वापर

सायबर फसवणुकीसाठी बहुउद्देशीय वापर

या सिमकार्डचा वापर सायबर फ्रॉडसाठी कॉलिंग करणे, बनावट ॲप्लिकेशनची नोंदणी, बँक खात्यांशी सिमकार्ड लिंक करून फसवणुकीचे व्यवहार करणे तसेच बनावट नावाने ई-मेल आयडी तयार करणे अशा विविध कारणांसाठी केला जात होता. या माध्यमातून आरोपी स्वतःची ओळख लपवून सायबर गुन्हे करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

विशेष म्हणजे, सिमकार्ड पुरविणाऱ्या आरोपींच्या पासपोर्टची तपासणी केली असता ते तब्बल २५ ते ३० वेळा दुबईला गेल्याचे आढळून आले आहे. या टोळीने पुरविलेल्या सिमकार्डचा अन्य किती सायबर गुन्ह्यांमध्ये वापर झाला आहे, याचा तपास सध्या सुरू आहे.या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली असून, सिमकार्डचा संपूर्ण तपशील आणि त्यांचा इतर गुन्ह्यांशी असलेला संबंध शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, वैभव पाटील, पोलीस उपनिरीक्षक रोहित बोळस, सागर पोमण, प्रकाश कातकाडे यांच्यासह सायबर पोलिसांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

Post Views: 19
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसंगीताच्या सुरावटीत पत्रकार-कलाकारांचा गौरव!
Next Article वेगाच्या मैदानात सारंगीची बाजी! ‘डेक्कन कॉन्करर्स’मध्ये लेडीज चॅम्पियन
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

November 22, 2026

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026

एटीएममध्ये मदतीचा बहाणा अन् कार्डची अदलाबदल; ज्येष्ठ नागरिकाला ३.६२ लाखांचा गंडा!

November 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 22, 20260

पत्र्याच्या शेडमध्ये प्रवेश करून स्टेनलेस स्टील, तांबे, पितळ, अॅल्युमिनियमसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरट्यांनी पळविला भोसरी प्रतिनिधी:…

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026

नेरलेतील दोन तरुणांना मारहाण प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाची गंभीर दखल

November 22, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?