Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»माजी मंत्री स्व.रामकृष्ण मोरे यांच्या पुण्यतिथीकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे दुर्लक्ष
पिंपरी चिंचवड

माजी मंत्री स्व.रामकृष्ण मोरे यांच्या पुण्यतिथीकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे दुर्लक्ष

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 2, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
काँग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी केला निषेध व्यक्त

पिंपरी(प्रतिनिधी) :-पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते स्वर्गीय प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून आज(दि.२) मुख्य इमारती परिसरात आदरांजली वाहण्यात आली नाही तसेच राम रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील तैल चित्राला साधा पुष्पहार अर्पण करून अभिवादनही करण्यात आले नसल्याने काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या निषेधार्थ त्यांनी महानगरपालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांना पत्र देऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसच्या वतीने रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये स्व प्रा रामकृष्ण मोरे यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.

पत्रात म्हटले की,प्रा. स्व.रामकृष्ण मोरे यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासासाठी तसेच शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. शहराच्या विकासाला दिशा देणारे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी कार्य करणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. अशा महान व्यक्तिमत्त्वाच्या पुण्यतिथीनिमित्त महानगरपालिकेकडून अभिवादन न होणे ही बाब अत्यंत खेदजनक, निषेधार्ह आणि शहरवासीयांच्या भावना दुखावणारी आहे.

प्रा. रामकृष्ण मोरे यांचे नाव शहराच्या विकासाशी जोडलेले असून, त्यांच्या कार्याचा आणि योगदानाचा सन्मान राखणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. मात्र, पुण्यतिथीच्या दिवशी साधा पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याची औपचारिकताही पार पाडण्यात आली नसल्याने महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.या प्रकाराची गंभीर दखल घेऊन महानगरपालिका आयुक्तांनी संबंधित विभागाच्या अधिकारी व जबाबदार कर्मचाऱ्यांकडून खुलासा मागवावा. तसेच, पुण्यतिथीच्या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधितांवर योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी.

या शहराला दूरदृष्टी ने विकासित करणारे आणि पिंपरी चिंचवड सारख्या एका साध्या गावाला आशिया खंडाच्या जागतिक पातळीपर्यंत नेऊन पोहोचवण्याचे कार्य केलेले,वाय सी एम रुग्णालयाची निर्मिती असेल शहरामध्ये सांस्कृतिक कार्यासाठी निर्माण केलेले प्रेक्षागृह आणि इतरही महत्वाचे शहरातील कार्य आणि शिक्षण मंत्री असताना पहिलीपासून इंग्रजी आणि आईचे नाव दाखल्यावर ठेवण्याचे ऐतिहासिक निर्णय घेतलेले, स्वर्गीय प्राध्यापक रामकृष्ण मोरे सरांचे नाव हे दिवंगत मान्यवरांच्या जयंती पुण्यतिथी मध्ये आदरांजली वाहावयाच्या यादीमध्ये नसावा ही बाब शहरवासीयांसाठी अत्यंत खेदजनक, निराशाजनक आणि संताप निर्माण करून देणारी आहे.तात्काळ स्व. प्रा. रामकृष्ण मोरे सरांचे नाव हे सदर आदरांजली वाहण्याच्या मान्यवरांच्या यादीमध्ये समाविष्ट करून घ्यावे.

Post Views: 6
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleदुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर पशुपालक,मच्छीमार यांना अर्थसहाय्य करावे
Next Article दुबईतून सायबर फसवणुकीचे रॅकेट चालविणारा मुख्य आरोपी जेरबंद!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

November 5, 2026

पिंपरी-चिंचवडच्या आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीनिमित्त मिळणार ७ ते १५ हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?