Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»निगडी सेक्टर क्र. २२ मधील रिक्त सदनिकांमध्ये अनधिकृत प्रवेश करू नये; अन्यथा कारवाई
पिंपरी चिंचवड

निगडी सेक्टर क्र. २२ मधील रिक्त सदनिकांमध्ये अनधिकृत प्रवेश करू नये; अन्यथा कारवाई

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 1, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी प्रतिनिधी….केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियान (JnNURM) तसेच शहरी गरीबांसाठी मूलभूत सेवा (BSUP) योजनेंतर्गत निगडी येथील सेक्टर क्र. २२ मध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या व सध्या रिक्त असलेल्या ६४० सदनिकांमध्ये कोणीही अनधिकृत प्रवेश अथवा अतिक्रमण करू नये. अन्यथा संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या JnNURM – BSUP योजनेंतर्गत निगडी येथील सेक्टर क्र. २२ मध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविण्यास मंजुरी देण्यात आली होती. या प्रकल्पांतर्गत एकूण ११ हजार ७६० सदनिकांच्या बांधकामाचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी ३ हजार ४४० सदनिकांचे काम पूर्ण झाले असून, २ हजार ८८० सदनिका पात्र लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, या प्रकल्पाबाबत मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेशामुळे प्रकल्पातील उर्वरित ६४० सदनिकांचे वाटप व बांधकामाची पुढील कार्यवाही स्थगित आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पाबाबत कोणताही नवीन कायदेशीर बदल झालेला नसून, न्यायालयाचे जैसे थे (Status Quo) आदेश लागू आहेत.

मात्र, प्रकल्पातील रिक्त सदनिकांमध्ये काही नागरिकांकडून जबरदस्तीने प्रवेश करून अनधिकृतरीत्या ताबा घेण्याचे प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय, काही व्यक्तींकडून इतरांना सदनिकांमध्ये घुसखोरी करण्यासाठी प्रवृत्त केले जात असल्याची बाबही समोर आली आहे. याबाबतच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येते की, या प्रकल्पाचे काम सध्या न्यायालयाच्या आदेशानुसार जैसे थे (Status Quo) स्थितीत असून, कोणत्याही प्रकारचे बांधकाम, सदनिकांचे वाटप अथवा अन्य कार्यवाही करण्यास परवानगी नाही. त्यामुळे प्रकल्पातील रिक्त सदनिकांमध्ये कोणत्याही नागरिकाने अनधिकृतपणे प्रवेश करणे, ताबा घेणे अथवा अतिक्रमण करणे बेकायदेशीर आहे. रिक्त असलेल्या या सदनिकांमध्ये अनधिकृतपणे प्रवेश केल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात येत आहे.

Post Views: 6
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article७० नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या आर्या कांबळेचा महापालिकेत विशेष सन्मान!
Next Article आंदोलन तात्पुरते स्थगित परंतु कारवाईसाठी पाठपुरावा चालूच राहणार- शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे 
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

November 5, 2026

पिंपरी-चिंचवडच्या आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीनिमित्त मिळणार ७ ते १५ हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?