Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»७० नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या आर्या कांबळेचा महापालिकेत विशेष सन्मान!
पिंपरी चिंचवड

७० नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या आर्या कांबळेचा महापालिकेत विशेष सन्मान!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 1, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
कुणाल मार्केटमधील भीषण आगीत दाखविले प्रसंगावधान; धाडस आणि समयसूचकतेचे सर्वत्र कौतुक

पिंपरी-चिंचवड : चिंचवड येथील चाफेकर चौक परिसरातील कुणाल मार्केट इमारतीच्या पार्किंगमध्ये लागलेल्या भीषण आगीत प्रसंगावधान राखून सुमारे ७० नागरिकांचे प्राण वाचविण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या कु. आर्या विजय कांबळे (वय २०) हिचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विशेष सन्मान करण्यात आला. आर्याने दाखविलेल्या धाडसाचे आणि समयसूचकतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

कुणाल मार्केट इमारतीमध्ये सुमारे ४० दुकाने आणि ३८ सदनिका आहेत. पहाटे दीडच्या सुमारास इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागल्याचे लक्षात येताच आर्या हिने तातडीने आरडाओरडा करून इमारतीतील नागरिकांना सावध केले. नागरिकांना सुरक्षिततेसाठी टेरेसवर जाण्याचे आवाहन करत तिने अग्निशमन विभागालाही घटनेची माहिती दिली.

घटनेचे गांभीर्य ओळखून आर्याने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे नागरिकांना वेळीच सुरक्षित ठिकाणी हलविण्याची प्रक्रिया सुरू झाली. काही मिनिटांत अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर टेरेसवर अडकलेल्या नागरिकांना शेजारील इमारतीत सुरक्षितपणे हलविण्यात आले. आर्याच्या धाडसामुळे सुमारे ७० नागरिकांचे प्राण वाचविण्यात मदत झाली.

आर्या कांबळे ही आकुर्डी येथील डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये डिझाइन विषयाच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. स्वतःचा जीव धोक्यात असतानाही इतरांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत तिने दाखविलेली सामाजिक बांधिलकी आणि धैर्य शहरासाठी प्रेरणादायी ठरले आहे.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आर्या हिचा विशेष सन्मान करून तिच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुलदीप जंगम यांच्यासह पदाधिकारी, नगरसदस्य आणि अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

आर्या कांबळे हिने दाखविलेल्या धाडसी वृत्तीचा गौरव करताना महापालिकेच्या वतीने तिच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. संकटाच्या प्रसंगी नागरिकांच्या मदतीला धावून जाण्याचा तिचा आदर्श शहरातील तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

 

Post Views: 6
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपीएमपीएमएलच्या चालक-वाहकाने दाखविली माणुसकी; आजारी महिलेसाठी बस नेली थेट ससून रुग्णालयात!
Next Article निगडी सेक्टर क्र. २२ मधील रिक्त सदनिकांमध्ये अनधिकृत प्रवेश करू नये; अन्यथा कारवाई
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

November 5, 2026

पिंपरी-चिंचवडच्या आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीनिमित्त मिळणार ७ ते १५ हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?