Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»आंदोलन तात्पुरते स्थगित परंतु कारवाईसाठी पाठपुरावा चालूच राहणार- शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे 
पिंपरी चिंचवड

आंदोलन तात्पुरते स्थगित परंतु कारवाईसाठी पाठपुरावा चालूच राहणार- शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे 

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 1, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड/सांगवी (प्रतिनिधी) :- सांगवी येथील संविधान चौकातील भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे शिल्प हटविल्याच्या प्रकरणावरून आज(दि.१)संविधान सन्मान निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी आंदोलनाच्या आतापर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेत संविधान शिल्प हटविण्याच्या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, या ठिकाणी संविधान सृष्टी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्र उभारण्याची मागणी करून ती आंदोलन जरी तात्पुरते स्थगित झाले असले तरी पीडब्ल्यूडी क्वार्टरच्या जागेवर संविधान सृष्टी उभारणे व नगरसेविका तृप्ती कांबळे यांनी केलेल्या कृत्याविरुद्ध न्यायालयात दाद मागणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

यावेळी आंदोलन कर्त्याच्या सर्वाना मते सहमती मिळाल्यानंतर आंदोलन दिवाळीमुळे तात्पुरते स्थगित करून अजून तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे आणि मारुती भापकर यांनी यावेळी आपल्या भूमिका स्पष्ट करून आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. त्यानुसार पुढील दिशा या आंदोलनात ठरवण्यात आली.

“१४ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला ग्रामस्थांची बैठक झाल्यानंतर, १५ ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने नागरिक या परिसरातून जात असताना, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने २०२२ मध्ये उभारलेले भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे शिल्प हटविण्यात आले. तसेच जेसीबीच्या साहाय्याने स्मारकाचा काही भाग उद्ध्वस्त करण्यात आला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, संविधानाचा आणि देशाचा सन्मान दुखावणारी आहे.या घटनेनंतर महानगरपालिकेच्या ह प्रभागातील अधिकाऱ्यांनी १५ ऑक्टोबर रोजी पोलीस आयुक्तांना पत्र देऊन स्मारक हटविण्याच्या घटनेची माहिती दिली होती. स्मारकाच्या विकासासाठी अतिरिक्त निधी मागितला असला, तरी त्यासंदर्भात कोणताही प्रशासकीय आदेश, काम सुरू करण्याचा आदेश किंवा वर्क ऑर्डर देण्यात आलेली नव्हती. तरीही स्मारक उद्ध्वस्त करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले होते”

_____ नरेंद्र बनसोडे,शहराध्यक्ष कॉंग्रेस पक्ष,पिंपरी चिंचवड 

त्यानंतर काँग्रेसच्या वतीने १७ ऑक्टोबर रोजी पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, कारवाई होत नसल्याने २० ऑक्टोबर रोजी घटनास्थळी पुन्हा बांधकाम सुरू झाल्याची माहिती मिळताच काँग्रेस कार्यकर्ते तेथे दाखल झाले. सांगवी पोलीस ठाण्यात जाऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे सांगितले; मात्र, एफआयआरची प्रत आणि गुन्ह्यातील कलमांची माहिती देण्यात आली नव्हती. त्यानंतर २२ ऑक्टोबरपासून संविधान चौकात आंदोलन सुरू करण्यात आले. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी एफआयआरची प्रत मिळाल्यानंतर त्यामध्ये संतोष कांबळे आणि अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, जेसीबी चालक, वाहन आणि संबंधित पुराव्यांबाबत पुढील कारवाईची माहिती मिळाली नव्हती.आंदोलनादरम्यान पोलिसांकडून अपेक्षित तपास आणि समेट बैठक घडवून आणली नाही.संवेदनशील विषयावर परस्परविरोधी भूमिका असलेल्या गटांना एकत्र आणण्याऐवजी आंदोलनाची परवानगी दिल्या गेली.

आंदोलनाच्या माध्यमातून नागरिकांकडून आलेल्या सूचनांनुसार संविधान चौकात केवळ संविधानाच्या प्रास्ताविकेचे शिल्प उभारण्याऐवजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा. याशिवाय, परिसरातील मोडकळीस आलेल्या पीडब्ल्यूडीच्या क्वार्टर्सच्या जागेचा उपयोग करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्र किंवा अध्ययन सृष्टी निर्माण करावी. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आणि सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून वसतिगृह उभारण्यात यावे.या मागण्यांसंदर्भात महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून, पुढील काळात महानगरपालिका, पोलीस आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय, कला संचालनालय आणि नगरविकास विभागाकडून आवश्यक परवानग्या मिळविण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे.

संविधान शिल्प हटविण्याच्या प्रकरणावरून आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न होत होता.संविधानाची प्रास्ताविका हा आमचा आत्मा आहे. ती या देशाचा आत्मा आणि भारतीय नागरिकांचा सन्मान आहे. आमची लढाई कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नाही, तर संविधानविरोधी प्रवृत्तीविरुद्ध आहे. त्या प्रवृत्तीचे समर्थन करणाऱ्यांविरोधातही आमचा संघर्ष सुरू राहील.संविधानाचा सन्मान राखण्यासाठी आणि सांगवी परिसरातील नागरिकांच्या मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा निर्धार आहे.

सभेला मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा भगतसिंग परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अशोकराव मोरे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहीतुले, काँग्रेस अनुसूचित जाती-जमाती विभागाचे शहराध्यक्ष रवी नांगरे, बी बी शिंदे, अनिता सोनवणे, अनिता साळवे, कविता कोंडे, डॉ. राजेश मंगल,आप पार्टी चे शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट, आप महिला अध्यक्ष कविता कोंडे, स्वराज इंडियाचे प्रदीप पवार, काँग्रेसचे सोशल मीडियाचे अध्यक्ष कुणाल भोसले, अप्पा शिंदे, हिराचंद जाधव, सदाशिव तळेकर ,हरीश डोळस, रवी भोजकर ,देवदत्त रानवडे ,शाही ओवाळ, बाबा गायसमुद्रे ,विरेंद्र गायकवाड ,प्रवीण कांबळे, शाहू गायकवाड ,अशोक मंगल ,गौरी नरसिंगे ,विलास सकट ,सविता सकट ,कृष्णा जाधव आदि उपस्थित होते.यांच्यासह विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनिगडी सेक्टर क्र. २२ मधील रिक्त सदनिकांमध्ये अनधिकृत प्रवेश करू नये; अन्यथा कारवाई
Next Article एकता दौड, व्याख्यान आणि संगीतमय देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

November 5, 2026

पिंपरी-चिंचवडच्या आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीनिमित्त मिळणार ७ ते १५ हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?