Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»सांगवीतील पीडब्ल्यूडी क्वार्टर्सच्या जागेवर संविधान सृष्टी व विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन सृष्टी उभारा – शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे 
पिंपरी चिंचवड

सांगवीतील पीडब्ल्यूडी क्वार्टर्सच्या जागेवर संविधान सृष्टी व विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन सृष्टी उभारा – शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे 

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 31, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड/सांगवी(प्रतिनिधी) :- सांगवी येथील संविधान चौकातील संविधानाच्या प्रास्ताविकेचे शिल्प हटविल्याप्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून आता या परिसराचा व्यापक विकास करण्याची मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. काँग्रेस आणि समविचारी पक्ष संघटनेच्या आंदोलनाचा आज (दि.३०) नववा दिवस होता.सांगवीतील पीडब्ल्यूडी क्वार्टर्सच्या जागेवर संविधान सृष्टी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आणि वसतिगृह उभारून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन सृष्टी’ विकसित करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

बनसोडे यावेळी म्हणाले की,संविधान चौकातील संविधानाच्या प्रास्ताविकेचे शिल्प बेकायदेशीरपणे हटवून जेसीबीच्या साहाय्याने स्मारक उद्ध्वस्त केल्याप्रकरणी संबंधित नगरसेविका तृप्ती संतोष कांबळे, संतोष कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.तसेच हटविण्यात आलेली प्रास्ताविका पुन्हा त्याच ठिकाणी स्थापित केली जावी.आंदोलनादरम्यान नागरिक आणि विविध संघटनांशी झालेल्या चर्चेतून या परिसरात व्यापक स्वरूपाचे स्मारक उभारण्याची मागणी पुढे आली आहे. संविधानाची निर्मिती, संविधानाची मूल्ये, प्रास्ताविका आणि मानवी हक्क यांची माहिती देणारी संविधान सृष्टी या ठिकाणी उभारण्यात यावी.

सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी आणि पिंपळे निलख परिसरातील नागरिकांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि विद्यार्थ्यांसाठी मोठी अभ्यासिका उभारण्याची गरज असून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या या परिसरात मोठी असल्याने अभ्यासिका आणि विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारल्यास त्याचा मोठा फायदा होईल.सांगवीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) मोडकळीस आलेल्या क्वार्टर्सची जागा महानगरपालिकेने उपलब्ध करून घ्यावी. त्यातील सुमारे एक एकर जागेवर हे अध्ययन केंद्र विकसित करावे.

या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पोलीस आयुक्तालय, कलासंचालनालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि नगरसचिव विभाग यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.संविधानाच्या प्रास्ताविकेच्या पुनर्स्थापनेपुरते आंदोलन मर्यादित न ठेवता, या घटनेच्या माध्यमातून शहरात संविधान जागृती, विद्यार्थी हित आणि सामाजिक प्रबोधनाचे केंद्र निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे मत नरेंद्र बनसोडे यांनी व्यक्त केले.

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहानगरपालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणा आणि खर्चात बचत करा – स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांचे निर्देश
Next Article पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेमध्ये कोट्यवधींच्या विविध विकासकामांना मंजुरी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

November 5, 2026

पिंपरी-चिंचवडच्या आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीनिमित्त मिळणार ७ ते १५ हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?