Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

मदत नव्हे, सामाजिक कर्तव्य समजून कातकरी बांधवांची दिवाळी केली गोड!

November 8, 2026

स्वच्छतेच्या राष्ट्रीय क्षितिजावर पिंपरी चिंचवडची गौरवशाली भरारी

November 8, 2026

चिमुकल्यांच्या स्वप्नांना नवी भरारी; आयुक्त दाम्पत्याची स्नेहवनमधील मुलांसोबत दिवाळी!

November 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»महानगरपालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणा आणि खर्चात बचत करा – स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांचे निर्देश
पिंपरी चिंचवड

महानगरपालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणा आणि खर्चात बचत करा – स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांचे निर्देश

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 31, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

स्थायी समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना; बजेट बुकमधील कामे मुदतीत पूर्ण करण्याचे आवाहन

पिंपरी-चिंचवड: – महानगरपालिकेचा कारभार अधिक गतिमान, शिस्तबद्ध आणि पारदर्शक ठेवण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी गांभीर्याने काम करावे, असे निर्देश स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी स्थायी समिती बैठकीत दिले.पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक आज पार पडली. यामध्ये विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली. तसेच, महापालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा व आर्थिक नियोजनाचा सभापती बारणे यांनी सविस्तर आढावा घेतला. महापालिकेची तिजोरी सावरण्यासाठी आणि खर्चात कपात करण्यासाठी सर्व विभागांचे सहकार्य अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

या बैठकीत उपस्थितीबाबत कडक निर्देश देण्यात आले असून, सर्व संबंधित अधिकारी, विभागप्रमुख, कार्यकारी अधिकारी आणि ह्युमन रिसोर्सेस (HR) यांच्या उपस्थितीची नोंद घेतली जाणार आहे. जे अधिकारी अनुपस्थित असतील, त्यांना अनुपस्थित राहण्याचे कारण स्पष्ट करावे लागेल किंवा त्यांच्या वतीने दुसऱ्या कोणाला बैठकींना पाठवावे. महानगरपालिकेचे आर्थिक धोरण सुधारण्यासाठी प्रत्येक विभागाने आपला खर्च कसा वाचवता येईल, याबाबतचा सविस्तर अहवाल १० दिवसांच्या आत सादर करणे बंधनकारक राहील, अशा सूचना देखील त्यांनी केल्या.महापालिकेच्या मालमत्तेचा योग्य वापर करण्यावर भर द्यावा. वापराविना मोकळ्या पडलेल्या मालमत्तामधून मनपाला कसे उत्पन्न मिळेल, याचे नियोजन करावे.

महानगरपालिकेच्या मालकीच्या सर्व मालमत्तांचे योग्य मॉनिटरिंग करणे ही केवळ एका विशिष्ट विभागाची किंवा व्यक्तीची जबाबदारी नसून, महापालिकेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याची ती सामायिक जबाबदारी असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. जर एखादा विभाग सोडून इतर काही निदर्शनास आले, तर संबंधित विभागाला सांगून ती जबाबदारी पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची बायोमॅट्रिक हजेरी १००% असणे अनिवार्य असून, यामध्ये कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. मात्र, काही ठिकाणी आरोग्य विभागातील कर्मचारी पाणी पुरवठ्याचे काम करतात आणि त्यांची बायोमॅट्रिक हजेरी होत नाही, याबाबत शहानिशा करून योग्य ती सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले.

बजेट बुकमध्ये समाविष्ट असलेली सर्व कामे आगामी काळात निश्चित वेळेत पूर्ण झाली पाहिजे. ज्या विभागांची कामे अपूर्ण आहेत किंवा ज्या कामांचे बजेट मंजूर झाले आहे, त्या कामांचा सविस्तर अहवाल १० दिवसांच्या आत सादर करण्याचे आदेश सभापती बारणे यांनी बैठकीत दिले. तसेच, अधिकाऱ्यांच्या टेबलवर फाईल्स विनाकारण प्रलंबित ठेवू नयेत; फाईल किती दिवस प्रलंबित आहे आणि जास्त काळ थांबल्यास त्याची कारणे वरिष्ठांना पत्रद्वारे कळवणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. फाईल मंजुरीची प्रक्रिया जलदगतीने पार पाडण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. याशिवाय, महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या, त्यांची कर्तव्ये आणि कामाची स्थिती याचा आढावा घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्याची सूचना बैठकीत करण्यात आली.

“महानगरपालिकेचा कारभार करत असताना जनतेच्या पैशाचा योग्य वापर झाला पाहिजे आणि प्रत्येक विभागाने खर्चात बचत करणे काळाची गरज आहे. आमच्या बजेट बुकमध्ये जी कामे मंजूर आहेत, ती वेळेत आणि दर्जेदार झालीच पाहिजेत. जर एखादी फाईल किंवा काम विनाकारण थांबत असेल, तर त्यामागील ठोस कारण आम्हाला लेखी स्वरूपात हवे आहे. महापालिकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकमेकांच्या समन्वयाने काम करून पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाला अधिक गतिशीलता द्यावी, हीच स्थायी समितीची मुख्य अपेक्षा आहे.” 

—- अभिषेक बारणे, सभापती- स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महापालिका.

Post Views: 5
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसासवड शहरात फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करा!
Next Article सांगवीतील पीडब्ल्यूडी क्वार्टर्सच्या जागेवर संविधान सृष्टी व विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन सृष्टी उभारा – शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे 
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

स्वच्छतेच्या राष्ट्रीय क्षितिजावर पिंपरी चिंचवडची गौरवशाली भरारी

November 8, 2026

चिमुकल्यांच्या स्वप्नांना नवी भरारी; आयुक्त दाम्पत्याची स्नेहवनमधील मुलांसोबत दिवाळी!

November 8, 2026

आमदार अण्णासाहेब बनसोडे व नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे यांच्या सौजन्याने दिवाळी पहाट रंगली

November 8, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

मदत नव्हे, सामाजिक कर्तव्य समजून कातकरी बांधवांची दिवाळी केली गोड!

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 8, 20260

मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेचा स्तुत्य उपक्रम; ६५ कातकरी कुटुंबांसह पालांमध्ये राहणाऱ्या गरीब महिलांना…

स्वच्छतेच्या राष्ट्रीय क्षितिजावर पिंपरी चिंचवडची गौरवशाली भरारी

November 8, 2026

चिमुकल्यांच्या स्वप्नांना नवी भरारी; आयुक्त दाम्पत्याची स्नेहवनमधील मुलांसोबत दिवाळी!

November 8, 2026

रोहित पठारे हत्या प्रकरणाच्या तपासासाठी ‘एसआयटी’ स्थापन करा!

November 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?