Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

मदत नव्हे, सामाजिक कर्तव्य समजून कातकरी बांधवांची दिवाळी केली गोड!

November 8, 2026

स्वच्छतेच्या राष्ट्रीय क्षितिजावर पिंपरी चिंचवडची गौरवशाली भरारी

November 8, 2026

चिमुकल्यांच्या स्वप्नांना नवी भरारी; आयुक्त दाम्पत्याची स्नेहवनमधील मुलांसोबत दिवाळी!

November 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»चिमुकल्यांच्या स्वप्नांना नवी भरारी; आयुक्त दाम्पत्याची स्नेहवनमधील मुलांसोबत दिवाळी!
पिंपरी चिंचवड

चिमुकल्यांच्या स्वप्नांना नवी भरारी; आयुक्त दाम्पत्याची स्नेहवनमधील मुलांसोबत दिवाळी!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 8, 2026No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसोबत डॉ. विजय सूर्यवंशी व डॉ.आरती सूर्यवंशी यांनी साजरा केला आनंदाचा सण; फराळासोबत शिक्षणासाठी टॅबची अनमोल भेट

पिंपरी, दिनांक ८ नोव्हेंबर २०२६ : दिवाळी म्हणजे आनंदाची देवाणघेवाण, प्रेमाची उधळण आणि नात्यांमधील जिव्हाळा जपण्याचा सण! याच सणाचा खरा आनंद समाजातील गरजू मुलांच्या चेहऱ्यावर फुलविण्याचा संवेदनशील प्रयत्न पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि त्यांच्या पत्नी डॉ. आरती सूर्यवंशी यांनी केला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षण व संगोपनासाठी कार्यरत असलेल्या ‘स्नेहवन’ संस्थेतील चिमुकल्यांसोबत त्यांनी दिवाळीचा आनंद साजरा केला. मुलांसोबत फराळाचा गोडवा वाटला, त्यांच्या स्वप्नांना जाणून घेतले आणि शिक्षणाच्या वाटेवर नवी भरारी घेण्यासाठी टॅबची अनमोल भेट दिली. आयुक्त दाम्पत्याच्या या प्रेमळ भेटीने स्नेहवनमधील मुलांची दिवाळी केवळ प्रकाशमयच झाली नाही, तर त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे आणि आत्मविश्वासाचे नवे हास्यही फुलले.

आळंदीपासून साधारण १० किलोमीटर वर कोयाळी फाटा येथे स्नेहवन नावाची संस्था अशोक देशमाने व त्यांच्या पत्नी अर्चना देशमाने हे चालवतात. या संस्थेत जात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व त्यांच्या पत्नी डॉ.आरती सूर्यवंशी यांनी दिवाळी सण साजरा केला. स्नेहवनमधील मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य, त्यांच्या डोळ्यांतील स्वप्ने आणि शिकण्याची जिद्द अनुभवताना आयुक्त दाम्पत्यही भारावून गेले. डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संस्थेच्या संपूर्ण प्रकल्पाची पाहणी करून तेथील विविध उपक्रमांची माहिती घेतली. मुलांना दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आला. तसेच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लागावा, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ज्ञानाची नवी दालने खुली व्हावीत, यासाठी आयुक्तांनी मुलांना टॅब भेट दिले. ही भेट म्हणजे केवळ एक उपकरण नव्हे, तर त्यांच्या स्वप्नांना दिलेली नवी दिशा होती.

आत्मविश्वास कधीही हरवू देऊ नका; शिक्षण घेणे थांबवू नका!

या भेटीतील सर्वांत भावस्पर्शी क्षण ठरला तो म्हणजे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, डॉ.आरती सूर्यवंशी आणि मुलांमधील मनमोकळा संवाद. मुलांनी आयुक्तांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासातील अडचणी, सरकारी अधिकारी होण्यासाठी केलेला संघर्ष, महापालिकेचे कामकाज आणि गरजू नागरिकांची कामे कशा पद्धतीने मार्गी लावली जातात, असे अनेक प्रश्न विचारले.

मुलांच्या प्रत्येक प्रश्नाला आयुक्तांनी अत्यंत आपुलकीने उत्तरे दिली. आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी विट्टी-दांडू, सुरपारंब्यासारख्या खेळांचा उल्लेख केला. आर्मी ऑफिसर म्हणून झालेली निवड, त्यानंतर कस्टम अधिकारी, सहकार विभागातील काम, कोल्हापूर आणि रायगड येथील प्रशासकीय जबाबदाऱ्या, जिल्हाधिकारी आणि पुढे महानगरपालिका आयुक्त म्हणून केलेला प्रवास त्यांनी मुलांसमोर उलगडला. ते म्हणाले, शिक्षण घेताना अडचणी येऊ शकतात; मात्र आपला आत्मविश्वास कमी पडता कामा नये. कोणत्याही परिस्थितीत शिक्षण घेणे थांबवू नका. रोज काहीतरी नवीन शिका, नियमित अभ्यास करा आणि वाचनाची सवय लावा. आयुष्यात पुढे जाण्यासाठी जिद्द आणि सातत्य अत्यंत महत्त्वाचे आहे.

सरकारी सेवेतील आपल्या अनुभवातून त्यांनी मुलांना एक मोलाचा संदेशही दिला. आपल्याकडे काम घेऊन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू आले पाहिजे. गरजू लोकांची मदत करणे, त्यांची कामे मार्गी लावणे, हा प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याचा विचार असला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी मुलांनी त्यांच्या वाचनाची आवड, त्यांनी वाचलेली पुस्तके तसेच टेस्लासारख्या आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील घडामोडींबाबतही उत्सुकतेने प्रश्न विचारले. मुलांच्या या जिज्ञासू वृत्तीचे आयुक्तांनी कौतुक केले. ‘मला तुमच्या गोष्टी ऐकायच्या आहेत. लहानपणी तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या, हेही मला जाणून घ्यायचे आहे,’ असे म्हणत त्यांनी मुलांशी संवाद अधिक जिव्हाळ्याचा केला.

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रश्नावर बोलताना डॉ. सूर्यवंशी यांनी अत्यंत भावनिक आवाहन केले. राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असली, तरी शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबाचा आणि मुलांच्या भवितव्याचा विचार करून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये. कितीही कठीण काळ असला तरी शासन आपल्या पाठीशी आहे. कोणताही वाईट काळ कायम राहत नाही. धैर्याने आणि संयमाने त्याला सामोरे गेले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

हरवलेले छत्र पुन्हा मिळणार नाही; पण स्वप्नांना आकाश नक्की देता येईल!

डॉ. आरती सूर्यवंशी यांनीही मुलांशी संवाद साधताना त्यांच्या जिद्दीचे आणि आत्मविश्वासाचे मनापासून कौतुक केले. त्या म्हणाल्या, आज येथे मुलांसोबत दिवाळी साजरी करताना खूप आनंद झाला. आयुष्यातील छत्र हरवले असले, तरी प्रत्येकाच्या मनात एक दुर्दम्य शक्ती असते. त्या शक्तीला ओळखून तिला जागृत करता आले पाहिजे. प्रत्येक समस्येवर उत्तर असते, फक्त ते शोधण्याची जिद्द आपल्यात असली पाहिजे.

स्नेहवनसारख्या संस्था शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि संगोपनासाठी पुढे येत आहेत, ही अत्यंत समाधानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. योग्य शिक्षण, चांगले संस्कार आणि प्रेमळ वातावरण मिळाले, तर हीच मुले उद्याच्या भारताचे सक्षम आणि जबाबदार नागरिक बनतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विशेष म्हणजे, मुलांनीच संपूर्ण शाळा आणि विविध लॅबची माहिती त्यांना दिली. मुलांचा आत्मविश्वास आणि विषयांची जाण पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. “या मुलांमध्येच भविष्यातील आयएएस अधिकारी, आयटी तज्ज्ञ, पत्रकार आणि मानसशास्त्रज्ञ दडलेले आहेत. या विद्यार्थ्यांची भविष्यातील प्रगती पाहण्याची मला नक्कीच आवडेल,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

स्नेहवनमध्ये केवळ शिक्षण नाही, तर जगण्याचे बळही!

स्नेहवनमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या मुलांचे संगोपन केले जाते. येथील मुलांना संस्था केवळ पुस्तकी शिक्षण देत नाही, तर स्वावलंबी होण्याचे आणि प्रत्यक्ष आयुष्य जगण्याचे धडेही देते. येथे गोशाळा, बायोगॅस प्रकल्प, सौरऊर्जा प्रकल्प, मुलांसाठी ओपन जिम, स्किल डेव्हलपमेंट सेंटर, बेकरी व्यवसायाचे प्रशिक्षण, तसेच विविध कौशल्ये आत्मसात करण्यासाठी तब्बल १५ प्रकारच्या लॅब उभारण्यात आल्या आहेत. एमपीएससी-यूपीएससी प्रशिक्षण केंद्र, सायन्स लॅब, कंटेनर ग्रंथालय अशा विविध सुविधांच्या माध्यमातून मुलांच्या सर्वांगीण विकासाचा प्रयत्न केला जात आहे. संस्थेच्या परिसरात ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश बाबा आमटे यांच्या हस्ते लावण्यात आलेले पेरूचे झाडही या कार्याला एक भावनिक संदर्भ देणारे ठरते. या सर्व उपक्रमांची माहिती मुलांनीच आयुक्त दाम्पत्याला दिली. प्रत्येक लॅबची रचना, तेथे चालणारे प्रयोग, विविध प्रकल्प आणि त्यामागील उद्देश मुलांनी अत्यंत आत्मविश्वासाने समजावून सांगितला. या चिमुकल्यांच्या ज्ञानाची, जिज्ञासेची आणि संवादकौशल्याची प्रगल्भता पाहून उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले.

Post Views: 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleरोहित पठारे हत्या प्रकरणाच्या तपासासाठी ‘एसआयटी’ स्थापन करा!
Next Article स्वच्छतेच्या राष्ट्रीय क्षितिजावर पिंपरी चिंचवडची गौरवशाली भरारी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

स्वच्छतेच्या राष्ट्रीय क्षितिजावर पिंपरी चिंचवडची गौरवशाली भरारी

November 8, 2026

आमदार अण्णासाहेब बनसोडे व नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे यांच्या सौजन्याने दिवाळी पहाट रंगली

November 8, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

मदत नव्हे, सामाजिक कर्तव्य समजून कातकरी बांधवांची दिवाळी केली गोड!

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 8, 20260

मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेचा स्तुत्य उपक्रम; ६५ कातकरी कुटुंबांसह पालांमध्ये राहणाऱ्या गरीब महिलांना…

स्वच्छतेच्या राष्ट्रीय क्षितिजावर पिंपरी चिंचवडची गौरवशाली भरारी

November 8, 2026

चिमुकल्यांच्या स्वप्नांना नवी भरारी; आयुक्त दाम्पत्याची स्नेहवनमधील मुलांसोबत दिवाळी!

November 8, 2026

रोहित पठारे हत्या प्रकरणाच्या तपासासाठी ‘एसआयटी’ स्थापन करा!

November 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?