Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

मदत नव्हे, सामाजिक कर्तव्य समजून कातकरी बांधवांची दिवाळी केली गोड!

November 8, 2026

स्वच्छतेच्या राष्ट्रीय क्षितिजावर पिंपरी चिंचवडची गौरवशाली भरारी

November 8, 2026

चिमुकल्यांच्या स्वप्नांना नवी भरारी; आयुक्त दाम्पत्याची स्नेहवनमधील मुलांसोबत दिवाळी!

November 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»छत्रपती संभाजी नगर»रोहित पठारे हत्या प्रकरणाच्या तपासासाठी ‘एसआयटी’ स्थापन करा!
छत्रपती संभाजी नगर

रोहित पठारे हत्या प्रकरणाच्या तपासासाठी ‘एसआयटी’ स्थापन करा!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 8, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
आरोपींवर मकोका लावून खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्याची मागणी; मुख्यमंत्र्यांना निवेदन

छ.संभाजीनगर/वैजापूर प्रतिनिधी: वैजापूर येथील बौद्ध युवक रोहित अनिल पठारे यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (SIT) सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, तसेच आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई करून खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा, अशी मागणी आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी, वैजापूर यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले.

रोहित पठारे यांची जातीयवादी मानसिकतेतून निर्घृण हत्या करण्यात आल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. या घटनेत आरोपींनी संघटितपणे कट रचल्याचा संशय व्यक्त करत, हत्येच्या संपूर्ण कटाचा पर्दाफाश करून मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली स्वतंत्र SIT स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, वैजापूर पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासाबाबत रोहित पठारे यांचे कुटुंबीय तसेच वैजापूर तालुक्यातील अनुसूचित जातीच्या समाजबांधवांनी अविश्वास व्यक्त केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सद्यस्थितीतील तपास प्रक्रियेवर वरिष्ठ स्तरावर देखरेख ठेवून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी भूमिका निवेदनकर्त्यांनी मांडली आहे.

तसेच या प्रकरणातील आरोपींविरुद्ध मकोका कायद्यांतर्गत कारवाई करून खटला जलदगती न्यायालयात चालवावा, जेणेकरून पीडित कुटुंबीयांना लवकर न्याय मिळेल, अशी मागणीही करण्यात आली आहे.

या निवेदनावर आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते दिनकर ओंकार, रमेश गायकवाड, बंडू कांबळे, सुरेश पाटील, विजय वाहुळ, विशाल इंगळे, मोहन म्हस्के, नाना म्हस्के, किरण मांदळे, नरेश पाखरे, नितीन आढमाने, मुकेश खोतकर, रवी मगर, धर्मेंद्र बनकर, सोनू नरवडे, संदीप जमधडे, अभिजित शरणागत, सागर बागुल, अभिमन्यू आंभोरे, अजय राठोड, कपिल बनकर, मिलिंद जमधडे, आनंद गायकवाड, प्रशांत त्रिभुवन, विजय मोकळे, आबासाहेब कसबे, राजवीर त्रिभुवन आणि अंकुश पठारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

रोहित पठारे हत्या प्रकरणातील सत्य समोर यावे, हत्येच्या कटातील सर्व संबंधितांचा शोध लागावा आणि पीडित कुटुंबीयांना न्याय मिळावा, यासाठी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Post Views: 4
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआमदार अण्णासाहेब बनसोडे व नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे यांच्या सौजन्याने दिवाळी पहाट रंगली
Next Article चिमुकल्यांच्या स्वप्नांना नवी भरारी; आयुक्त दाम्पत्याची स्नेहवनमधील मुलांसोबत दिवाळी!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

‘सरकार मायबाप’ कवितेतून विजय मोकळे करंजगावकर यांचा व्यवस्थेवर घणाघात!

October 21, 2026

आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीच्या शिलेदार मंचावरून हजारो कलाकारांनी दाखवला आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध

September 15, 2026

‘आदर्श शाळे’च्या यशाला सलाम!

September 11, 2026

वैजापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा!

September 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

मदत नव्हे, सामाजिक कर्तव्य समजून कातकरी बांधवांची दिवाळी केली गोड!

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 8, 20260

मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेचा स्तुत्य उपक्रम; ६५ कातकरी कुटुंबांसह पालांमध्ये राहणाऱ्या गरीब महिलांना…

स्वच्छतेच्या राष्ट्रीय क्षितिजावर पिंपरी चिंचवडची गौरवशाली भरारी

November 8, 2026

चिमुकल्यांच्या स्वप्नांना नवी भरारी; आयुक्त दाम्पत्याची स्नेहवनमधील मुलांसोबत दिवाळी!

November 8, 2026

रोहित पठारे हत्या प्रकरणाच्या तपासासाठी ‘एसआयटी’ स्थापन करा!

November 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?