Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेमध्ये कोट्यवधींच्या विविध विकासकामांना मंजुरी
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेमध्ये कोट्यवधींच्या विविध विकासकामांना मंजुरी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 31, 2026No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. स्थायी समितीची साप्ताहिक सभा नुकतीच महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात संपन्न झाली. या सभेमध्ये शहरातील विविध प्रभाग आणि परिसरातील रस्ते विकास, दुरुस्ती, आरोग्य व नागरी सुविधांशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.

या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या प्रमुख कामांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

रुग्णालय यंत्रणा देखभाल: चिंचवड येथील तालेरा रुग्णालयातील HVAC, OT आणि विद्युत विषयक यंत्रणेचे पुढील २ वर्षांसाठी चालन, देखभाल व दुरुस्ती करण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली.सुदर्शननगर हेल्थ क्लब जवळील काम: प्रभाग क्र. १९ मधील सुदर्शननगर हेल्थ क्लब जवळील जुने सी.डी. वर्क पाडून नवीन बांधण्याच्या कामाच्या निविदेला मंजुरी देण्यात आली.

रावेत भागातील रस्त्यांचा विकास: प्रभाग क्र. १६ मधील रावेत भागात ताब्यात आलेले डी.पी. व नॉन डी.पी. रस्ते विकसित करण्याच्या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC) यांची QCBS पद्धतीने नेमणूक करण्यास मंजुरी देण्यात आली.

रस्ते डांबरीकरण (पवनानगर व आदर्शनगर): सन २०२६-२७ करीता प्रभाग क्र. २२ मधील पवनानगर व आदर्शनगर परिसरातील रस्ते हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्याचे काम करून घेण्यास मंजुरी मिळाली.

तात्पुरती ध्वनिक्षेपण व प्रकाश व्यवस्था: ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध कार्यक्रमांकरिता तात्पुरत्या स्वरूपाची ध्वनिक्षेपण, सीसीटीव्ही, जनरेटर व प्रकाश व्यवस्था करण्याच्या निविदेला मान्यता दिली. तसेच ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पिंपरी व थेरगाव उपविभागातील विविध कार्यक्रमांसाठीच्या निविदा मंजूर करण्यात आल्या.

आकुर्डी परिसरातील स्थापत्य कामे: प्रभाग क्र. १५ मधील आकुर्डी गावठाण व इतर परिसरात स्ट्रॉर्म वॉटर लाईन, फुटपाथ व इतर स्थापत्य विषयक कामे (नागरिकांचा सहभाग अंतर्गत) करण्यासाठी करारनामा करण्यास मान्यता दिली.

दफनभूमी काळजीवाहक मुदतवाढ: दापोडी, निगडी आणि दिघी येथील एकूण ५ मुस्लिम व लिंगायत दफनभूमींसाठी नवीन निविदा प्रक्रिया चालू असेपर्यंत, संबंधित धर्मदाय संस्थांना किमान वेतन दरानुसार १ महिन्यासाठी मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली.

स्ट्रीट लाईट विद्युत पुरवठा: ‘क’ क्षेत्रीय कार्यालय प्रभाग क्र. २ मधील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे-नाशिक रोड ते सीएनजी पंपपर्यंत रस्ता अद्यावत करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या रस्त्यावरील स्ट्रीट लाईट, डेकोरेटिव्ह पोल आणि हायमास्ट पोल कार्यान्वित करण्यासाठी म.रा.वि.वि.कं.लि. कंपनीस सुरक्षा ठेव, सर्व्हिस चार्जेस व प्रोसेसिंग फी अदा करण्यास मंजुरी दिली.

राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान: अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कार्यरत असलेल्या शहर अभियान व्यवस्थापक व समुदाय संघटक या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत मुदतवाढ देण्यास मान्यता दिली.

प्रभाग क्र. १६, १७, १८, २२ मधील रिक्षा टेम्पो व्यवस्था: प्रभाग क्र. १६, १७, १८ व २२ मधील कामासाठी नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पुढील ८ महिन्यांसाठी वाहन, इंधन व चालकासह मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

मनपा इमारतींची दुरुस्ती व फर्निचर कामे: प्रभाग क्र. १५ मधील मनपा इमारतींची स्थापत्य विषयक दुरुस्ती, फर्निचर तसेच देखभाल दुरुस्तीची कामे करण्याच्या निविदेला मंजुरी देण्यात आली.

वाय. सी. एम. रुग्णालयातील मशीन दुरुस्ती: यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (YCM) X-ray विभागातील Digital Radiography System मशीनच्या हमी कालावधीनंतर थेट पद्धतीने सिएमसी (CMC) करण्यासाठी मशीनच्या मूळ उत्पादक कंपनीसोबत करारनामा करण्यास मान्यता देण्यात आली.

पदपथ उभारणी व रोड फर्निचर कामे: प्रभाग क्र. ९ मध्ये विविध ठिकाणी पदपथ उभारणे आणि नेहरुनगर, विठ्ठलनगर परिसरातील स्थापत्य कामांसाठीची निविदा स्वीकृत करण्यात आली. तसेच प्रभाग क्र. १० मधील शाहूनगर भागात रोड फर्निचर विषयक कामांनाही मंजुरी देण्यात आली.

विविध भागांतील रस्ते आणि नाला दुरुस्ती: प्रभाग क्र. ६ (धावडेवस्ती, गुळवेवस्ती), प्रभाग क्र. ८ (सेक्टर १,२,३,४,६), प्रभाग क्र. २० (विशाल थिएटर, संत तुकारामनगर, कासारवाडी व एमआयडीसी), आणि प्रभाग क्र. ६ मधील नाला दुरुस्ती व स्मशंकरभूमी स्थापत्य कामे अशा विविध प्रभागांतील रस्ते दुरुस्ती, डांबरीकरण, स्ट्रॉर्म वॉटर चेंबर्स आणि नाल्यांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी पात्र ठरलेल्या निविदांना स्थायी समितीने मंजुरी दिली.

सार्वजनिक सुविधा व स्वच्छतागृहांची दुरुस्ती: प्रभाग क्र. १५, प्रभाग क्र. ४ (दिघी-बोपखेल), प्रभाग क्र. ३ (चोविसावाडी, वडमुखवाडी, मोशी, डुडूळगाव) आणि प्रभाग क्र. १८ परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती, रस्ते दुरुस्ती, पेव्हिंग ब्लॉक बसवणे आणि दिशानिर्देश फलक लावणे या कामांच्या निविदांना मंजुरी देण्यात आली.

औद्योगिक प्रशिक्षण संस्था विकास: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगवी येथील विद्यार्थ्यांना दृश्याधारित शिक्षण व व्हर्च्युअल प्रयोगशाळा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीच्या ई-लर्निंग मॉड्यूल खर्चाच्या प्रस्तावाचे स्थायी समितीने अवलोकन केले. तसेच महिला आयटीआय कासारवाडी येथे अतिवृष्टीमुळे तातडीने साहित्य खरेदीच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली.या सर्व विकासकामांना स्थायी समितीने मंजुरी दिल्याने शहरातील नागरी पायाभूत सुविधा अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.

Post Views: 6
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसांगवीतील पीडब्ल्यूडी क्वार्टर्सच्या जागेवर संविधान सृष्टी व विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन सृष्टी उभारा – शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे 
Next Article दिवाळीपूर्वी बोनस-वेतन द्या, अन्यथा फौजदारी कारवाई!…. प्रमोद जगताप
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

November 5, 2026

पिंपरी-चिंचवडच्या आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीनिमित्त मिळणार ७ ते १५ हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?