Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांची “विनम्र अभियान पदयात्रा” यशस्वी
पिंपरी चिंचवड

कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांची “विनम्र अभियान पदयात्रा” यशस्वी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 29, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

 महापौर रवी लांडगे यांचे महानगरपालिकेला कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोनस व वेतन अदा करण्याचे आदेश!

पिंपरी (प्रतिनिधी) दि.२९ ऑक्टोबर २०२६:- राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर “विनम्र अभियान पदयात्रा” काढण्यात आली. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे यांची महापौर कार्यालयात भेट घेऊन कंत्राटी व मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनस आणि वेतनासंदर्भात चर्चा केली. यावेळी कामगारांना २०२५-२६ या वर्षाचा बोनस आणि मासिक वेतन दिवाळीपूर्वी, म्हणजेच ३ नोव्हेंबर २०२६ च्या आत अदा करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. महापौर रवी लांडगे यांनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत बैठकीला उपस्थित असलेले संबंधित मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांना तातडीने कार्यवाही करून बोनस दिवाळीपूर्वी अदा करण्याचे परिपत्रक काढण्याच्या सूचना दिल्या.

भिमसृष्टीतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभियान पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी हजारो कामगार सहभागी झाले होते.यावेळी परिसर कामगाराच्या घोषणांनी दणाणून गेला.

कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी विनम्र अभियान पदयात्रे दरम्यान महापौर रवी लांडगे यांना निवेदन दिले. त्या निवेदनात त्यांनी आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी वाहन चालक वैद्यकीय मधील स्वच्छता सेवक,वार्ड बॉय,नर्सेस, तांत्रिक कर्मचारी तसेच वैद्यकीय अधिकारी उद्यान विभाग मधील कर्मचारी, अग्निशमन विभागातील वाहनचालक व अग्निशमन कर्मचारी, पालिकेच्या सर्व शाळांमधील स्वच्छता सेवक शिपाई व इतर कर्मचारी, स्मशानामधील सर्व कर्मचारी, पाणीपुरवठा व जलवाहिनी विभाग मधील सर्व कर्मचारी सर्व प्रभागांमध्ये काम करणारे कंत्राटी पद्धतीवर दाखवण्यात आलेल्या सुमारे 4500 कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन देण्यात यावे.महापालिकेने रक्कम रुपये पाच लाखापर्यंतचा परिवारासह विमा उतरावावा.कर्मचाऱ्याचा अपघाती अथवा आजारी पडून मृत्यू झाल्यास वारसदारास रक्कम रुपये 25 लाख भरपाई पोटी देण्यात यावेत.तसेच अनुकंपा तत्वावर वारसदार यास महापालिकेत नोकरी देण्यात यावी या कायदेशीर मागण्यांना मान्यता द्यावी.

“कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी कामगारांच्या न्यायासाठी आणि हक्कांसाठी आयुष्यभर प्रयत्न केले आहेत. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी ते कायम झटत असतात. आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेतील सर्व कंत्राटी आणि मानधनावरील कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला पाहिजे.बोनस देण्यासंदर्भातील परिपत्रक आज संध्याकाळी किंवा उद्या काढण्यात येईल. आचारसंहितेबाबतची घोषणा अद्याप झालेली नसल्याने त्यानंतर सोमवारी सर्व कामगारांना बोनस देण्याबाबतची प्रक्रिया सविस्तरपणे निश्चित करण्यात येईल”

…… रवी लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड.

कामगारनेते यशवंतभाऊ भोसले म्हणाले की,”दिवाळी बोनसच्या मागणीसाठी आज महापौर रवी लांडगे यांची भेट घेतली.यावेळी महापौरांनी कामगार अधिकारी जगताप यांना तातडीने परिपत्रक काढण्याचे आदेश दिले. कायदेशीररीत्या पात्र असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला पाहिजे, अशी भूमिका महापौरांनी घेतली.काही ठेकेदार पगारामध्ये बोनस समाविष्ट असल्याचे सांगून बोनस देण्यापासून पळवाट काढतात.अशा प्रकारे बोनस न देणाऱ्या ठेकेदारांबाबतही महापौरांनी सूचना केल्या आहेत.याशिवाय समान काम, समान वेतन, कर्मचाऱ्यांची इन्शुरन्स पॉलिसी, तसेच मानधनावर काम करणाऱ्या नर्सेसच्या विखंडित झालेल्या ठरावाबाबत आणि कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या विषयांवर सोमवारी किंवा मंगळवारी बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन महापौरांनी दिले असून त्यांनी घेतलेल्या सकारात्मक या निर्णयाबद्दल हजारो कामगारांच्या वतीने महापौर रवी लांडगे यांचे मनःपूर्वक आभार मानतो”

राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी विविध विषयांवर महापौरांची भेट घेऊन चर्चा केली. या बैठकीत महापौरांनी बोलावून मानधनावरील आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस अदा करण्याबाबत परिपत्रक काढण्याच्या सूचना दिल्या आहेत.सर्व विभागांतील कंत्राटदारांना त्यांच्या कामगारांना बोनस देण्याबाबत परिपत्रकाद्वारे सूचना करण्यात येणार आहेत. हे परिपत्रक आज संध्याकाळी किंवा जास्तीत जास्त सोमवारी सकाळपर्यंत काढण्यात येईल.तसेच महापौरांनी दिलेल्या सूचनांनुसार विविध विषयांवर बैठक घेऊन सविस्तर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी दिली.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article९१ लाखांच्या टेंडरवर सह्यांसाठी लाचेची मागणी? पाणीपुरवठा विभागातील मुख्य अभियंत्याविरुद्ध गुन्हा
Next Article दिवाळीनिमित्त ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये वस्तू संकलन मोहीम
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

November 5, 2026

पिंपरी-चिंचवडच्या आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीनिमित्त मिळणार ७ ते १५ हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?