Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»दिवाळीनिमित्त ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये वस्तू संकलन मोहीम
पिंपरी चिंचवड

दिवाळीनिमित्त ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये वस्तू संकलन मोहीम

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 29, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

वापरात नसलेल्या सुस्थितीतील वस्तू गरजूंना देण्याचे महापालिकेचे आवाहन

पिंपरी. दि : २९ ऑक्टोबर २०२६: दिवाळीनिमित्त घरांची साफसफाई करताना वापरात नसलेल्या; मात्र सुस्थितीत असलेल्या वस्तूंचा पुनर्वापर व्हावा आणि त्या गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचाव्यात, या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग व स्वच्छ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘आर.आर.आर. (रिड्यूस, रीयूज, रिसायकल) कलेक्शन ड्राइव्ह’ राबविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत शहरातील गृहनिर्माण संस्थामध्ये वस्तू संकलन मोहीम आयोजित करण्यात आली आहे.

दिवाळी निमित्त अनेक घरांमध्ये साफसफाई केली जाते. या वेळी कपडे, पुस्तके, शैक्षणिक साहित्य, खेळणी, भांडी, चादरी, पडदे, फर्निचर तसेच वापरण्यायोग्य इलेक्ट्रॉनिक वस्तू बाजूला काढल्या जातात. या वस्तू फेकून न देता त्यांचा पुनर्वापर व्हावा आणि गरजू नागरिकांना त्यांचा लाभ मिळावा, यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने या विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे.

“कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी वस्तूंचा पुनर्वापर आणि संसाधनांचा सुयोग्य वापर महत्त्वाचा आहे. वापरण्यायोग्य वस्तू थेट कचऱ्यात टाकण्याऐवजी त्यांचा पुनर्वापर केल्यास पर्यावरणावरील ताण कमी होण्यास मदत होते. नागरिकांनी आर.आर.आर. कलेक्शन ड्राइव्हमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक शहर घडविण्यास हातभार लावावा”

……. डॉ. विजय सूर्यवंशी, महापालिका आयुक्त

 “नागरिकांनी घरातील वापरात नसलेल्या, परंतु सुस्थितीत व पुनर्वापरयोग्य असलेल्या वस्तू आर.आर.आर. केंद्रांमध्ये जमा कराव्यात. कपडे, पुस्तके, खेळणी, भांडी, शैक्षणिक साहित्य आणि इतर उपयुक्त वस्तू गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचविण्यास या उपक्रमामुळे मदत होईल. वस्तूंचा अपव्यय टाळणे, कचऱ्याचे प्रमाण कमी करणे आणि पर्यावरण संवर्धनाला हातभार लावणे, ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. त्यामुळे नागरिकांनी या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा.”

……उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, पिंपरी चिंचवड 

३१ ऑक्टोबर रोजी या ठिकाणी होणार वस्तूंचे संकलन:

रेनबो व्हिस्टा, आहेरनगर; सिद्धिविनायक विंड चाइम, रहाटणी; द वुड्स, वाकड; अक्षर एलिमेंटा व पॅलॅडिओ अपार्टमेंट, ताथवडे; द्वारका सनक्रेस्ट फेज १ व यश संकुल, पिंपळे सौदागर; ओमेगा पॅराडाइज, होरायझन्स ॲट वाकड व ला मेलोसा, वाकड; भूमी ओराबेल, सेलेस्टियल सोसायटी फेज २, राजलक्ष्मी ग्रीन्स सोसायटी, उदय हिलटॉप रेसिडेन्सी, संत ज्ञानेश्वर उद्यान व चंद्रभागा कॉर्नर, रावेत; तसेच रेणुका पंचतत्त्व, ताथवडे येथे वस्तू संकलन करण्यात येणार आहे.

१ नोव्हेंबर रोजी या ठिकाणी होणार वस्तूंचे संकलन:

वुड्सव्हिल फेज १, फेज २ व फेज ३, लोटस नंदवन फेज १, कुमार प्रिन्सव्हिल फेज १ आणि सेंट्रल पार्क रेसिडेन्सी, मोशी; रिव्हर रेसिडेन्सी फेज ३, चिखली; ऐश्वर्यम, आकुर्डी; गोखले वृंदावन, चिंचवड; ट्युलिप इन्फिनिटी वर्ल्ड, पुनावळे; मिलेनियम पॅसिफिक; वसंत ॲव्हेन्यू, ताथवडे; निसर्ग किरण, रहाटणी; गंगा स्काइज सोसायटी; वल्लभनगर, पिंपरी आणि कुमार प्रथम, मोशी येथे वस्तू संकलन मोहीम राबविण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी व मदतीसाठी संपर्क : 

आर.आर.आर. कलेक्शन ड्राइव्हसंदर्भात अधिक माहिती मिळविण्यासाठी किंवा मदतीसाठी नागरिकांनी ७०३०९०१९९३, ९१६८६८४६७० या क्रमांकावर संपर्क साधावा.

या मोहिमेमुळे वापरण्यायोग्य वस्तूंचा अपव्यय टाळण्यास, कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यास, पर्यावरणाचे संवर्धन करण्यास आणि गरजू व्यक्तींना उपयुक्त वस्तू उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे. दिवाळीचा आनंद इतरांसोबत वाटून घेत सामाजिक जबाबदारी जपण्यासाठी नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Post Views: 6
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleकामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांची “विनम्र अभियान पदयात्रा” यशस्वी
Next Article चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगमध्ये आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने टळली जीवितहानी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

November 5, 2026

पिंपरी-चिंचवडच्या आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीनिमित्त मिळणार ७ ते १५ हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?