Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»संविधान शिल्प तोडफोड प्रकरणी किरकोळ गुन्हा दाखल करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न?
पिंपरी चिंचवड

संविधान शिल्प तोडफोड प्रकरणी किरकोळ गुन्हा दाखल करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न?

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 25, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

काँग्रेसच्या बेमुदत ठिय्या आंदोलनाचा चौथा दिवस; नगरसेविकेवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी

चिंचवड/सांगवी, दि. २५ ऑक्टोबर २०२६ : सांगवी येथील संविधान चौकातील भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे शिल्प हटविण्यात आल्याच्या आणि स्मारकाच्या चौथऱ्याची मोडतोड झाल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाचा रविवारी चौथा दिवस होता. शिल्पाची पूर्ववत प्रतिष्ठापना करावी आणि या प्रकरणात संबंधित नगरसेविका तृप्ती संतोष कांबळे यांच्यासह दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी केली.

या प्रकरणात पोलिसांनी नगरसेविकेचे पती संतोष कांबळे यांच्यावर किरकोळ स्वरूपाचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत, राज्यकर्त्यांच्या दबावाखाली आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका बनसोडे यांनी केली. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

या प्रकरणात पोलिसांनी नगरसेविकेचे पती संतोष कांबळे यांच्यावर किरकोळ स्वरूपाचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत, राज्यकर्त्यांच्या दबावाखाली आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका बनसोडे यांनी केली. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

“संविधानाच्या प्रास्ताविकेचे शिल्प हटविणे आणि स्मारकाच्या चौथऱ्याची मोडतोड केल्याच्या घटनेमुळे संविधानप्रेमी नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे शिल्पाची सन्मानपूर्वक पुनर्स्थापना करणे आणि घटनेत सहभागी असलेल्या सर्व संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातील कलमे घटनेच्या गांभीर्याच्या तुलनेत अपुरी असल्याचा आरोपही त्यांनी केला. उपलब्ध पुरावे आणि घटनेचे स्वरूप विचारात घेऊन लागू कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करावी”

……. नरेंद्र बनसोडे,अध्यक्ष शहर काँग्रेस,पिंपरी चिंचवड. 

महानगरपालिकेने १५ ऑक्टोबर रोजी पोलीस आयुक्तांना पत्र देऊन या प्रकरणाची माहिती दिल्याचेही बनसोडे यांनी सांगितले. या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट करून प्रशासन आणि पोलिसांनी पुढील कार्यवाही करावी, असे ते म्हणाले.

शिल्प हटविण्यामागील उद्देशाची चौकशी करा

सांगवी परिसरातील इतर चौकांमध्ये महापुरुषांच्या आणि देवतांच्या मूर्ती असताना संविधानाच्या प्रास्ताविकेचे शिल्पच का हटविण्यात आले, असा सवाल उपस्थित करत या घटनेमागील नेमका उद्देश तपासण्याची मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी केली.

संविधान हा कोणत्याही एका पक्षाचा किंवा समाजाचा विषय नसून तो सर्व नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचा आधार आहे. संविधानाच्या सन्मानासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला केवळ पक्षीय राजकारणाच्या चौकटीत पाहणे चुकीचे आहे. संविधानाच्या प्रास्ताविकेच्या शिल्पाची पुनर्स्थापना करणे ही आंदोलनाची प्रमुख मागणी असल्याचे कांबळे यांनी स्पष्ट केले.

आंदोलनाची दिशा बदलण्यासाठी काही व्यक्तींना आंदोलनस्थळी पाठविणे, समाजमाध्यमांवर रील तयार करणे किंवा वादग्रस्त वक्तव्ये करणे असे प्रकार होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. संबंधित नगरसेविका आणि त्यांच्या पतीने या घटनेबद्दल चूक झाल्याची कबुली देऊन शहरातील नागरिकांची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.

स्थानिक आमदार शंकर जगताप यांनी संबंधितांना समज दिल्याचे सांगितले असले, तरी केवळ समज देऊन प्रश्न सुटणार नाही. शिल्पाची पुनर्स्थापना आणि नियमानुसार कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे, असे कांबळे म्हणाले.

विविध संघटनांचा आंदोलनाला पाठिंबा

या ठिय्या आंदोलनाला काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, सामाजिक व पुरोगामी चळवळीचे नेते मानव कांबळे, मारुती भापकर, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे प्रांताध्यक्ष शांताराम खुडे, छावा मराठा युवा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, आम आदमी पक्षाचे शशी बावनकर, पथारी संघटनेच्या नेत्या गौरी शेलार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी हरीश डोळस, देवदत्त रानवडे, हिराचंद जाधव, सदाशिव तळेकर, नबीलाल मुल्ला, गौरी नरसिंगे, कृष्णा जाधव, विल्यम साळवी, रवींद्र भोसकर, आप्पा शिंदे आणि आलोक लाड आदी उपस्थित होते.

आंदोलनाच्या प्रमुख मागण्या :

💮संविधानाच्या प्रास्ताविकेचे शिल्प पूर्ववत बसवावे.

💮घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी.

💮संबंधित नगरसेविका, त्यांचे पती आणि इतर सहभागी व्यक्तींच्या भूमिकेची चौकशी करावी.

💮प्रशासनाने या प्रकरणात स्पष्ट भूमिका घेऊन नागरिकांच्या भावना आणि संविधानाच्या सन्मानाचा विचार करावा.

Post Views: 9
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपैशांच्या वादातून कामगारावर दगडाने हल्ला; आरोपीला अटक
Next Article संविधान चौकाला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक’ नाव द्या; परिसर ‘संविधान सृष्टी’ म्हणून विकसित करा!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

November 5, 2026

पिंपरी-चिंचवडच्या आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीनिमित्त मिळणार ७ ते १५ हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?