Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»संविधानाची प्रस्ताविका पाडल्या संदर्भात सांगवीत काँग्रेसच्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात
पिंपरी चिंचवड

संविधानाची प्रस्ताविका पाडल्या संदर्भात सांगवीत काँग्रेसच्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 22, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार – शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे

चिंचवड/सांगवी(प्रतिनिधी)दि. २२ ऑक्टोबर २०२६ : सांगवी येथील संविधान चौकातील संविधानाच्या प्रास्ताविका स्मारकाला कथितरीत्या बेकायदेशीरपणे हटवून त्या ठिकाणी तोडफोड केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ, तसेच स्मारकाची पूर्ववत पुनर्स्थापना आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज गुरुवार, दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून संविधान चौक, सांगवी येथे बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. आंदोलनाचा आज पहिला दिवस असून, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी दिली आहे.

या आंदोलनात पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे कार्यकर्ते, पुरोगामी व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि संविधानप्रेमी नागरिक सहभागी झाले आहेत. संविधानाच्या प्रास्ताविकेचे महत्त्व अधोरेखित करत, संविधानाने दिलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे असे काँग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी सांगितले आहे.

यावेळी बनसोडे म्हणाले की,सांगवी येथील संविधान चौकातील प्रास्ताविका स्मारक हटविण्याची आणि तोडफोडीची घटना अत्यंत गंभीर असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ह’ प्रभाग अधिकाऱ्यांनी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी या कृतीबाबत पोलीस आयुक्तांना लेखी कळविले आहे. संविधानाचा सन्मान आणि नागरिकांच्या घटनात्मक मूल्यांचे रक्षण ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी असे मत बनसोडे यांनी व्यक्त केले.

संविधानाच्या प्रास्ताविका स्मारकाची पुनर्स्थापना आणि संबंधित प्रकरणात कायद्यानुसार ठोस कारवाई होईपर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. संविधानप्रेमी नागरिक, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते, सामाजिक संघटना आणि लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन आंदोलकांच्या वतीने करण्यात आले.

काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, पुरोगामी चळवळीचे नेते विचारवंत मानव कांबळे, सामाजिक चळवळीचे नेते मारुती भापकर, ओबीसी संघर्ष समितीचे आनंदा कुदळे, छावा मराठा युवा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, सर्वहारा उत्कर्ष समितीचे, बी.बी. शिंदे, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष शाहबुद्दीन शेख, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष, रवींद्र भोसकर, हरीश शिंदे, वीरेंद्र गायकवाड संदीप शिंदे सुरज माने, सदाशिव तळेकर, डेनिस देवनसन,नवीलाल मुल्ला,कबीर मोहम्मद, हिराचंद जाधव, हरीश डोळस बाबा गायसमुद्रे, मिलिंद बनसोडे, देवदत्त रानवडे, अनिता साळवे, अनिता सोनवणे, रितिका शर्मा,महावेद वाळुंजकर आदी उपस्थित होते.

Post Views: 12
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleवाकडमधील मानकर चौक ते छत्रपती चौक मार्ग वाहतुकीसाठी बंद!
Next Article प्रवाशाची हरवलेली पिशवी तत्परतेने शोधून दिली; PMPML आगारप्रमुख सुनील दिवाणजी यांचे कौतुक!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

November 5, 2026

पिंपरी-चिंचवडच्या आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीनिमित्त मिळणार ७ ते १५ हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?