Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»अप्पूघरमध्ये पर्यटकांची सुरक्षा रामभरोसो, महापालिका प्रशासनाकडे कामाची माहिती नाही?
पिंपरी चिंचवड

अप्पूघरमध्ये पर्यटकांची सुरक्षा रामभरोसो, महापालिका प्रशासनाकडे कामाची माहिती नाही?

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 15, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

प्रशासनाच्या लेखी उत्तरातून धक्कादायक माहिती, नगरसेवक संदीप वाघेरे आक्रमक;अप्पूघर ठेकेदाराला आंदण, महापालिकेचे कोणतेही नियंत्रण नाही

पिंपरी प्रतिनिधी – भाजपच्या स्थानिक नगरसेवकांसह सर्वांचा विरोध डावलून सत्ताधारी भाजपने निगडी येथील स्वर्गीय इंदिरा गांधी उद्यानातील सात एकरावरील अप्पूघर थेट १५ वर्षांसाठी पुष्पक अम्युजमेंटला भाड्याने दिले आहे. येथील राईड्सची सुरक्षा तपासणी ऑडीट, विद्युत सुरक्षेबाबत व इतर आवश्यक सुरक्षा प्रमाणपत्रांची कोणतीही पूर्तता करण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संदीप वाघेरे यांना महापालिका प्रशासनाने दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती समोर आली आहे. काम सुरु करण्याची आणि पूर्ण करण्याची प्रस्तावित कालमर्यादा, सध्याच्या कामाच्या प्रगतीबाबतचीही माहिती महापालिकेकडे उपलब्ध नाही. कोणतीही माहिती नसताना सात एकरवरील अप्पुघर ठेकेदाराला आंदण दिले आहे का, असा संतप्त सवाल नगरसेवक वाघेरे यांनी विचारला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या निगडी येथील स्वर्गीय इंदिरा गांधी उद्यानातील अप्पूघर पुष्पक अम्युजमेंटला सन २००५ मध्ये २१ वर्षांकरिता भाड्याने देण्यात आले होते. त्याची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपुष्टात आली. या संस्थेकडे ६ लाख ८३ हजार ६६५ रुपयांची थकबाकी आहे. असे असताना या ठेकेदाराने २०१५-१६ आणि २०१६-१७ मध्ये पाण्याचा तुटवडा असल्याने दोन वर्षे वॉटर पार्क बंद ठेवावा लागल्याचा दावा केला. कोरोनामध्ये मार्च २०२० ते डिसेंबर २०२२ पर्यंत अप्पुघर व वॉटर पार्क बंद असल्याने नुकसान झाल्याचे सांगून तीन वर्षांची मुदतवाढ मागितली होती. ठेकेदाराने तीन वर्षांची मुदतवाढ मागितली असताना सत्ताधारी भाजपने मेहरबानी दाखवित थेट १५ वर्षांची मुदतवाढ दिली.

याप्रकल्पाबाबत नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका प्रशासनाकडे लेखी उत्तरे मागितली होती. त्याला भूमी आणि जिंदगी विभागाने दिलेल्या लेखी उत्तरातून विविध धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. अप्पुघर हे सात एकर क्षेत्रफळावर विस्तारले आहे. प्रस्तावित राईड्स, मनोरंजन सुविधांसाठी आवश्यक असलेल्या परवानग्या घेतल्याची माहिती महापालिकेकडे नाही. राईड्सची सुरक्षा तपासणी ऑडीट, विद्युत सुरक्षेबाबत व इतर आवश्यक सुरक्षा प्रमाणपत्रांची कोणतीही पूर्तता करण्यात आली नाही. प्रकल्पाचे काम सुरु करण्याची आणि पूर्ण करण्याची प्रस्तावित कालमर्यादा, सध्याच्या कामाच्या प्रगतीबाबतची कोणतीही माहिती महापालिकेकडे नाही. प्रवेश, राईड शुल्काबाबत अद्याप कोणतेही धोरण निश्चित केले नाही. नागरिक, लहान मुले, पर्यटकांच्या सुरिक्षततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा कर्मचारी, वैद्यकीय सुविधा, आपत्कालीन सेवा, अग्निशमन व्यवस्था, आपत्कालीन बाहेर पडण्याचा मार्ग आहे की नाही, याबाबतही माहिती उपलब्ध नसल्याचे महापालिका प्रशासनाने लेखी उत्तरात सांगितले आहे. या प्रकल्पामुळे इंदिरा गांधी उद्यान, दुर्गादेवी टेकडी परिसरातील पर्यावरण, वाहतूक व स्थानिक नागरिकांवर होणाऱ्या संभाव परिणांबाबतचा कोणताही अभ्यास, अहवाल तयार करण्यात आला नसल्याने प्रशासनाने सांगितले. प्रशासनाकडे माहिती उपलब्ध नसतानाही प्रकल्प १५ वर्षांसाठी ठेकेदाराच्या घशात कशासाठी घातला असा संतप्त सवाल नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केला आहे.

“अप्पूघरचे काम कधी पूर्ण होणार आहे. कामाची सद्यस्थिती याबाबतची कोणतीही माहिती महापालिकेकडे उपलब्ध नाही. पर्यटकांच्या सुरिक्षततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. प्रकल्पावार महापालिकेचे कोणतेही नियंत्रण नाही. असे असताना अप्पुघर १५ वर्षांसाठी ठेकेदाराला आंदण दिले आहे. सत्ताधारी आणि प्रशासन शहरातील पर्यटन स्थळाची वाट लावत आहेत”

…..संदीप वाघेरे,नगरसेवक, पिंपरी चिंचवड 

Post Views: 12
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनाना पाटेकर आणि मधु कांबीकर यांना उद्या श्रद्धांजली
Next Article अभिजात मराठीच्या गौरवासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध स्पर्धांतील विजेत्यांचा सन्मान
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

November 5, 2026

पिंपरी-चिंचवडच्या आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीनिमित्त मिळणार ७ ते १५ हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?