Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»नाना पाटेकर आणि मधु कांबीकर यांना उद्या श्रद्धांजली
पिंपरी चिंचवड

नाना पाटेकर आणि मधु कांबीकर यांना उद्या श्रद्धांजली

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 15, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
पिंपरी-चिंचवड शहर कला-प्रेमी मंचातर्फे आयोजन; महापौर रवी लांडगे, भाऊसाहेब भोईर यांची प्रमुख उपस्थिती

पिंपरी, दि. १५ ऑक्टोबर : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवड शहर कला-प्रेमी मंचाच्या वतीने शुक्रवारी (दि. १६ ऑक्टोबर) श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील सायन्स पार्कमधील तारांगण सभागृहात सायंकाळी ४.३० वाजता ही सभा होणार आहे.

कला, साहित्य, नाटक आणि चित्रपट क्षेत्रात योगदान देणाऱ्या या दोन्ही कलाकारांच्या कलाप्रवासाचे स्मरण करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे. या सभेला शहरातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच पत्रकार व लेखक प्रदीप निफाडकर, लेखक प्रभाकर ओव्हाळ, ज्येष्ठ कलावंत वसंत अवसरीकर आणि ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ हेही उपस्थित राहणार आहेत.

नाना पाटेकर यांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र ओळख निर्माण केली. विविधांगी भूमिकांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला. दुसरीकडे, मधु कांबीकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीसह लोककला आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाला उजाळा देत या सभेत त्यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे संयोजन विजय जगताप, गोविंद वाकडे, अविनाश कांबीकर, नंदकुमार सातुर्डेकर, संभाजी बारणे, प्रवीण तुपे, अनिस पठाण आणि गणेश दिघे यांनी केले आहे.

Post Views: 13
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleधावडे वस्तीतील जी.व्ही.पी. पॉईंटचे ‘वेस्ट टू आर्ट’ संकल्पनेतून सुशोभीकरण
Next Article अप्पूघरमध्ये पर्यटकांची सुरक्षा रामभरोसो, महापालिका प्रशासनाकडे कामाची माहिती नाही?
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

November 5, 2026

पिंपरी-चिंचवडच्या आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीनिमित्त मिळणार ७ ते १५ हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?