Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»अभिजात मराठीच्या गौरवासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध स्पर्धांतील विजेत्यांचा सन्मान
पिंपरी चिंचवड

अभिजात मराठीच्या गौरवासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध स्पर्धांतील विजेत्यांचा सन्मान

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 15, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

निबंध लेखन, पत्रलेखन, समूह नृत्य आणि पसायदान पाठांतर स्पर्धा संपन्न

पिंपरी, दि. १५ ऑक्टोबर २०२६: मराठी भाषेचा समृद्ध साहित्यिक वारसा, सांस्कृतिक परंपरा आणि भाषेचे सौंदर्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’निमित्त महापालिका शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या वेळी विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांचा पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला.

विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी आवड निर्माण व्हावी, त्यांच्या लेखनकौशल्याला प्रोत्साहन मिळावे आणि महाराष्ट्राच्या साहित्यिक व सांस्कृतिक परंपरेची ओळख व्हावी, या हेतूने निबंध लेखन, पत्रलेखन, सामूहिक नृत्य आणि पसायदान पाठांतर अशा चार स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

निबंध लेखन स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील आपले विचार आणि कल्पकता शब्दबद्ध केली, तर पत्रलेखन स्पर्धेतून मराठी भाषेतील अभिव्यक्ती कौशल्याचे दर्शन घडवले. सामूहिक नृत्य स्पर्धेतील सादरीकरणातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे रंगतदार दर्शन घडले. पसायदान पाठांतर स्पर्धेतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचा आणि विश्वकल्याणाच्या संदेशाचा जागर करण्यात आला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले. स्पर्धांमधील विजेत्यांसह उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण सहभाग आणि मराठी भाषेच्या विविध पैलूंचे सादरीकरण हे या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.

यावेळी महापालिकेचे विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाचे व्यवस्थापक विकास वेताळ, पुणे श्रमिक पत्रकार संघांचे अध्यक्ष उमेश शेळके, सरचिटणीस हिरा सरवदे, उपाध्यक्ष किशोर बारकूले, सदस्य तुषार झरेकर, यांच्यासह शहरातील पत्रकार, विद्यार्थी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

अभिजात मराठी भाषेचा वारसा जतन करणे, तिचे साहित्यिक वैभव पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आणि विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी अभिमान व आत्मीयता निर्माण करणे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

स्पर्धांमधील विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे :-

१. निबंध लेखन स्पर्धा

• प्रथम क्रमांक : समृद्धी अंताळकर

• द्वितीय क्रमांक : प्रतिभा नितीन गायकवाड

• तृतीय क्रमांक : दिव्या संदीप मोरे

उत्तेजनार्थ पारितोषिके :

• भावना संजय आनंदपुरे

• रेहान फय्याज शेख

२. पत्रलेखन स्पर्धा

• प्रथम क्रमांक : पार्वती नरेश आठवले

• द्वितीय क्रमांक : अर्णव दत्तात्रय खांडे

• तृतीय क्रमांक : नेहा धनाजी गायकवाड

उत्तेजनार्थ पारितोषिके :

• अनन्या गुरुषरण सिंग

• आस्मी किरण सोळस्कर

३. समूह नृत्य स्पर्धा

• प्रथम क्रमांक : इंद्रायणीनगर प्राथमिक शाळा, भोसरी

• द्वितीय क्रमांक : पीसीएमसी इंग्रजी माध्यम शाळा, भोसरी (मुले)

• तृतीय क्रमांक : यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळा, थेरगाव

उत्तेजनार्थ पारितोषिके :

• प्राथमिक शाळा क्रमांक १०३, पुनावळे

• यशवंतराव चव्हाण प्राथमिक कन्या शाळा, थेरगाव

• प्राथमिक कन्या शाळा क्रमांक १०३, पुनावळे

४. पसायदान पाठांतर स्पर्धा

• प्रथम क्रमांक : श्रीपाद भागवत सावंत

• द्वितीय क्रमांक : राजलक्ष्मी उमेश आरदवाड

• तृतीय क्रमांक : श्रेया सुजित तापकिरे

उत्तेजनार्थ पारितोषिके :

• योगेश ज्ञानेश्वर सोरमारे

• आयशा संतोष गौतम

स्पर्धांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग

सामूहिक नृत्य स्पर्धेत शहरातील १५ शाळांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत एकूण २२३ विद्यार्थी आणि ३० शिक्षक सहभागी झाले. तसेच पसायदान पाठांतर स्पर्धेत एकूण १०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

विद्यार्थ्यांच्या सहभागातून मराठी भाषेचे महत्त्व, साहित्यिक अभिव्यक्ती आणि सांस्कृतिक मूल्ये अधोरेखित झाली. मराठी भाषेचा अभिमान जपत तिचा समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

Post Views: 73
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleअप्पूघरमध्ये पर्यटकांची सुरक्षा रामभरोसो, महापालिका प्रशासनाकडे कामाची माहिती नाही?
Next Article पवना नदीवरील पाडलेला बंधारा पुन्हा बांधा; सामाजिक कार्यकर्ते अमोल उबाळे यांची आयुक्तांकडे मागणी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

November 5, 2026

पिंपरी-चिंचवडच्या आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीनिमित्त मिळणार ७ ते १५ हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?