Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»बुद्धिबळ महासत्ता रशियात अन्वी हिंगेची सुवर्णभरारी; आशियाई शालेय स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्यपदकाची कमाई!
पिंपरी चिंचवड

बुद्धिबळ महासत्ता रशियात अन्वी हिंगेची सुवर्णभरारी; आशियाई शालेय स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्यपदकाची कमाई!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 11, 2026No Comments6 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
ब्लिट्झमध्ये नऊपैकी आठ गुणांसह अव्वल; स्टँडर्ड प्रकारात रौप्यपदक, आंतरराष्ट्रीय पदकांची संख्या पंधरावर

पिंपरी-चिंचवड : भारताची युवा बुद्धिबळपटू आणि वुमन कॅन्डिडेट मास्टर किताबधारक अन्वी दिपक हिंगे हिने रशियातील तुला येथे १ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या विसाव्या आशियाई शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत दिमाखदार कामगिरी करत भारताच्या शिरपेचात आणखी दोन मानाचे तुरे रोवले आहेत. अन्वीने मुलींच्या नऊ वर्षांखालील गटात जलदगती ब्लिट्झ प्रकारात सुवर्णपदक, तर स्टँडर्ड प्रकारात रौप्यपदक पटकावले. बुद्धिबळाची महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रशियाच्या भूमीत विविध देशांतील प्रतिस्पर्ध्यांशी लढत मिळवलेल्या या दुहेरी यशामुळे अन्वीच्या आंतरराष्ट्रीय पदकांची संख्या आता पंधरावर पोहोचली आहे.

अन्वी ही चिंचवड येथील एलप्रो इंटरनॅशनल स्कूलमध्ये चौथ्या इयत्तेत शिकत आहे. लहान वयातच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या अन्वीला तिचे प्रशिक्षक ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे, आंतरराष्ट्रीय मास्टर निखिल दीक्षित आणि मानसिक प्रशिक्षण मार्गदर्शक ऋतू बळ्यान चौधरी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. बुद्धिबळातील तांत्रिक तयारी, डावांचे विश्लेषण, स्पर्धात्मक अनुभव आणि मानसिक कणखरता या सर्व बाबींच्या जोरावर अन्वी सातत्याने प्रगती करत आहे.

ब्लिट्झमध्ये आठ विजय; सुवर्णपदकावर मोहोर…

अन्वीने ब्लिट्झ प्रकारात नऊ फेऱ्यांमध्ये आठ गुणांची कमाई करत स्पर्धेत अव्वल स्थान मिळवले. तिच्या खात्यात आठ विजय आणि केवळ एका पराभवाची नोंद झाली. तिने नऊपैकी आठ गुण मिळवत दुसऱ्या क्रमांकावरील तुर्कमेनिस्तानच्या बागुल जुमायेवा हिला अर्ध्या गुणाने मागे टाकले. जुमायेवाला साडेसात गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर रशियाच्या लेयला इसायेवाने सहा गुणांसह तिसरे स्थान मिळवले.

अन्वीच्या ब्लिट्झमधील कामगिरीचे वैशिष्ट्य म्हणजे तिने स्पर्धेतील अनेक प्रमुख प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवला. कझाकस्तानच्या अमालिया येद्रेसहेवा, रशियाच्या मिया कुद्र्याशोवा आणि लेयला इसायेवा यांच्यावर मात करत तिने आपली गुणवत्ता सिद्ध केली. या तिन्ही खेळाडूंनी अंतिम क्रमवारीत अनुक्रमे चौथे, पाचवे आणि तिसरे स्थान मिळवले.

तुर्कमेनिस्तानच्या जुमायेवाविरुद्ध पाचव्या फेरीत झालेला एकमेव पराभव वगळता अन्वीने सर्व सामने जिंकले. पराभवानंतर खचून न जाता तिने सलग चार विजय मिळवत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत दबावाखाली दाखवलेली जिद्द, एकाग्रता आणि मानसिक कणखरता विशेष उल्लेखनीय ठरली.

या प्रकारात अन्वीने १,८३२ चे कामगिरी मानांकन नोंदवले, तर तिच्या फिडे ब्लिट्झ मानांकनात ५८ गुणांची वाढ झाली. स्पर्धेपूर्वी १,६१५ मानांकन असलेल्या अन्वीने आपल्या मानांकनापेक्षा सरस कामगिरी करत विजेतेपद मिळवले. ब्लिट्झ प्रकारात मर्यादित वेळेत अचूक निर्णय घेणे, प्रतिस्पर्ध्याच्या डावपेचांना तातडीने प्रत्युत्तर देणे आणि वेळेच्या दबावात शांत राहणे आवश्यक असते. अन्वीने या सर्व आघाड्यांवर प्रभावी कामगिरी केली.

स्टँडर्ड प्रकारातही रौप्यपदकाची कमाई….

ब्लिट्झमधील सुवर्णयशाबरोबरच अन्वीने स्टँडर्ड प्रकारातही सातत्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन केले. मुलींच्या नऊ वर्षांखालील गटात तिने नऊ फेऱ्यांमध्ये साडेसहा गुण मिळवत दुसरे स्थान पटकावले. कझाकस्तानच्या अमालिया येद्रेसहेवाने आठ गुणांसह पहिले स्थान मिळवले, तर रशियाच्या मिया कुद्र्याशोवाने सहा गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला.

स्पर्धेत सहभागी होताना अन्वीचे मानांकन सर्वोच्च होते. संपूर्ण स्पर्धेत पदकाच्या शर्यतीत आपले स्थान कायम राखत तिने रौप्यपदक जिंकले. स्टँडर्ड प्रकारात खेळाडूंना प्रत्येक चालीचा सखोल विचार करण्यासाठी अधिक वेळ मिळतो. त्यामुळे डावाची दीर्घकालीन आखणी, प्याद्यांची रचना, पटावरील स्थानिक वर्चस्व, बचावात्मक कौशल्य आणि अंतिम टप्प्यातील अचूकता या बाबी निर्णायक ठरतात.

एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेत वेगवान ब्लिट्झ प्रकारात सुवर्ण आणि स्टँडर्ड प्रकारात रौप्य अशी दोन पदके मिळवणे हे अन्वीच्या अष्टपैलू बुद्धिबळ कौशल्याचे द्योतक आहे.

प्रशिक्षकांकडून अन्वीच्या कामगिरीचे कौतुक…

अन्वीचे बुद्धिबळ प्रशिक्षक आंतरराष्ट्रीय मास्टर निखिल दीक्षित म्हणाले, “रशियासारख्या बुद्धिबळाची समृद्ध परंपरा असलेल्या देशात आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य अशी दोन पदके मिळवणे ही अन्वीसाठी महत्त्वाची कामगिरी आहे. विशेषतः ब्लिट्झमध्ये नऊपैकी आठ गुण मिळवून तिने दाखवलेली एकाग्रता, वेगवान निर्णयक्षमता आणि पराभवानंतर पुनरागमन करण्याची वृत्ती कौतुकास्पद आहे. स्टँडर्ड आणि ब्लिट्झ या दोन्ही प्रकारांत पदक मिळवणे तिच्या खेळातील अष्टपैलुत्व दर्शवते. या अनुभवातून शिकत तिने सातत्याने मेहनत घेतली, तर भविष्यात आणखी मोठ्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करण्याची क्षमता तिच्यात आहे.”

अन्वीला ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभत असून, आंतरराष्ट्रीय मास्टर निखिल दीक्षित तिच्या डावांचे विश्लेषण, खेळातील सुधारणा आणि स्पर्धात्मक तयारीसाठी मार्गदर्शन करतात. मानसिक प्रशिक्षण मार्गदर्शक ऋतू बळ्यान चौधरी यांच्या मार्गदर्शनामुळे स्पर्धेतील तणाव हाताळणे, एकाग्रता टिकवणे आणि पराभवानंतर पुन्हा आत्मविश्वासाने खेळणे या बाबींवरही भर दिला जात आहे.

बुद्धिबळाच्या महासत्तेत भारतीय खेळाडूची चमक..

रशिया हा अनेक दशकांपासून जागतिक बुद्धिबळाच्या इतिहासातील प्रभावशाली देश राहिला आहे. सोव्हिएत काळापासून विकसित झालेल्या बुद्धिबळ प्रशिक्षणपद्धती, जागतिक दर्जाचे ग्रँडमास्टर्स, विश्लेषणाधारित तयारी आणि लहान वयापासून स्पर्धात्मक बुद्धिबळाला दिलेले महत्त्व यांमुळे रशियाने जागतिक स्तरावर विशेष स्थान निर्माण केले आहे.

तुला येथे झालेल्या या आशियाई स्पर्धेत भारतासह आशियातील विविध देशांतील खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेत बारा देशांतील एकूण ३१८ खेळाडूंनी भाग घेतला. सात, नऊ, अकरा, तेरा, पंधरा आणि सतरा वर्षांखालील वयोगटांमध्ये स्टँडर्ड, रॅपिड आणि ब्लिट्झ अशा विविध प्रकारांत सामने झाले. इतक्या मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत दोन पदके जिंकणे ही अन्वीच्या कारकिर्दीतील महत्त्वाची कामगिरी ठरली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर यापूर्वीही ठसा….

अन्वीने यापूर्वीही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. वयाच्या अवघ्या आठ वर्षे अकरा महिन्यांत तिने वुमन कॅन्डिडेट मास्टर हा फिडेचा किताब मिळवला. मे २०२६ मध्ये फिडेच्या प्रकाशित मानांकन यादीत ती नऊ वर्षांखालील मुलींच्या गटात जगातील सर्वोच्च मानांकनाची खेळाडू ठरली होती.

२०२५ मध्ये ग्रीस येथे झालेल्या जागतिक कॅडेट आणि युवा जलदगती व ब्लिट्झ स्पर्धेत तिने मुलींच्या आठ वर्षांखालील जलदगती प्रकारात उपविजेतेपद मिळवले होते. ताजिकिस्तानमधील दुशान्बे येथे झालेल्या पश्चिम आशिया युवा स्पर्धेत वैयक्तिक आणि सांघिक प्रकारांत मिळून सहा पदके पटकावली. राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक, तसेच २०२४ मधील आशियाई शालेय स्पर्धेत सांघिक जलदगती आणि ब्लिट्झ प्रकारांत रौप्यपदके, अशीही तिच्या यशस्वी कारकिर्दीत भर पडली आहे.

स्पेनमधील एक्स ओपन स्पर्धेत तिने ब गटात महिला विभागाचे विजेतेपद मिळवले होते. या स्पर्धेतील कामगिरीमुळे तिच्या फिडे मानांकनातही लक्षणीय वाढ झाली होती. यापूर्वीच्या या यशात तुला येथील सुवर्ण आणि रौप्यपदकांची भर पडल्याने तिच्या आंतरराष्ट्रीय पदकांची संख्या आता पंधरावर पोहोचली आहे.

प्रायोजकांचे पाठबळ अन्वीच्या प्रवासासाठी मोलाचे….

अन्वीच्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ प्रवासात तिच्या मेहनतीबरोबरच तिला मिळणारे संस्थात्मक पाठबळही महत्त्वाचे ठरत आहे. मोरडे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि लक्ष्य स्पोर्ट्स या संस्थांचे सहकार्य तिच्या क्रीडा प्रवासासाठी मोलाचे आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना सातत्यपूर्ण सराव, उच्च दर्जाचे प्रशिक्षण आणि विविध देशांतील स्पर्धांमध्ये सहभागी होण्याच्या संधी आवश्यक असतात. अशा प्रवासात प्रायोजकांकडून मिळणारा विश्वास आणि पाठिंबा युवा खेळाडूला मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे बळ देतो.

अन्वीचे वडील दिपक हिंगे म्हणाले, “अन्वीने रशियातील आशियाई शालेय बुद्धिबळ स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण आणि रौप्य अशी दोन पदके जिंकली, याचा आम्हाला मनापासून आनंद आणि अभिमान आहे. तिच्या मेहनतीला आणि स्वप्नांना योग्य दिशा देण्यासाठी कुटुंब म्हणून आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत; मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने खेळण्याच्या प्रवासात योग्य वेळी मिळणारे प्रोत्साहन आणि संस्थात्मक पाठबळ तितकेच महत्त्वाचे असते”

“मोरडे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि लक्ष्य स्पोर्ट्स यांनी अन्वीच्या बुद्धिबळ प्रवासाला दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभारी आहोत. त्यांनी दाखवलेला विश्वास आमच्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. अन्वीच्या क्षमतेवर विश्वास ठेवून तिच्या प्रगतीला हातभार लावणाऱ्या या संस्थांचे आम्ही विशेष आभार मानतो. भविष्यात अन्वीने आणखी मोठी आंतरराष्ट्रीय यशे मिळवून भारताचा गौरव करावा, हेच आमचे स्वप्न आहे. या प्रवासात तिला साथ देणाऱ्या तिच्या सर्व प्रशिक्षकांचे, शाळेचे आणि हितचिंतकांचेही आम्ही ऋणी आहोत.”

भारतासाठी खेळण्याचा अभिमान….

आपल्या यशाबद्दल अन्वी म्हणाली, “भारतासाठी खेळताना सुवर्ण आणि रौप्य अशी दोन पदके जिंकून मला खूप आनंद झाला. ब्लिट्झमध्ये सुवर्णपदक जिंकणे माझ्यासाठी खूप खास आहे. स्पर्धेत अनेक चांगल्या खेळाडूंविरुद्ध खेळायला मिळाले आणि प्रत्येक डावातून काहीतरी नवीन शिकायला मिळाले. माझ्या आई-बाबांचे आणि माझ्या सर्व प्रशिक्षकांचे मला नेहमी सहकार्य मिळते. मला अजून चांगला खेळ करायचा आहे, माझे मानांकन वाढवायचे आहे आणि भविष्यात भारतासाठी जागतिक स्तरावर मोठी विजेतेपदे जिंकायची आहेत.”

तुला येथील या स्पर्धेतील दुहेरी यशामुळे अन्वीने पुन्हा एकदा भारतीय युवा बुद्धिबळातील आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. स्टँडर्ड प्रकारातील रौप्यपदकाने तिच्या सखोल आणि संयमी खेळावर शिक्कामोर्तब केले, तर ब्लिट्झमधील सुवर्णपदकाने तिची चपळता, लढाऊ वृत्ती आणि दबावाखाली निर्णय घेण्याची क्षमता अधोरेखित केली. शाळा, प्रशिक्षक, कुटुंब आणि प्रायोजकांच्या पाठबळासह आंतरराष्ट्रीय बुद्धिबळात सातत्याने प्रगती करण्याच्या तिच्या ध्येयाच्या दिशेने ही दोन पदके महत्त्वाची पावले ठरली आहेत.

Post Views: 6
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleकारमधून ५० लाखांची रोकड लंपास; दोन आरोपी ८ तासांत जेरबंद!
Next Article ५५ वारकरी विद्यार्थ्यांसाठी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीतर्फे अन्नदान
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

November 5, 2026

पिंपरी-चिंचवडच्या आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीनिमित्त मिळणार ७ ते १५ हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?