पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते मुंबईत गौरव; पिंपरी-चिंचवड पोलीस दलासाठी अभिमानाचा क्षण
पिंपरी-चिंचवड, : पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना उल्लेखनीय प्रशासकीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक (President’s Police Medal – PPM) प्रदान करून गौरविण्यात आले. मुंबईतील लोकभवन येथील दरबार हॉलमध्ये शुक्रवारी आयोजित पदक अलंकरण समारंभात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते त्यांना हे पदक प्रदान करण्यात आले.
राष्ट्रपती महोदयांनी १५ ऑगस्ट २०२३ रोजी विनय कुमार चौबे यांना त्यांच्या उल्लेखनीय प्रशासकीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर केले होते. त्यानुसार ९ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या समारंभात त्यांना अधिकृतपणे पदक प्रदान करण्यात आले.
चौबे यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचा आणि प्रशासकीय सेवेतील उल्लेखनीय योगदानाचा गौरव मानला जात आहे. या सन्मानामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, पोलीस दलासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.
