१२०० चौरस मीटर बांधकाम जमीनदोस्त; महाराष्ट्र सुरक्षा बलाचे ५० जवान तैनात
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या सूचनेनुसार फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक १, चिखली येथे अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण पाच अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली असून, सुमारे १२०० चौरस मीटर बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.
फ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त अतुल पाटील यांच्या अधिपत्याखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी उपअभियंता हेमंत घोड, बीट निरीक्षक साईनाथ देसाई, प्रफुल भोकरे, ऐश्वर्या मासाळ, सूरज माने यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कारवाईदरम्यान सहा अतिक्रमणविरोधी पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे ५० जवान, महापालिकेचे दोन मजूर आणि १० कंत्राटी मजूर तैनात करण्यात आले होते. बांधकामे निष्कासित करण्यासाठी दोन ट्रॅक्टर ब्रेकर आणि दोन जेसीबी यंत्रांचा वापर करण्यात आला.
अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिकेने केलेल्या या कारवाईमुळे परिसरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
