Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»मुंबई»इगतपुरीतील औद्योगिक प्रदूषणाची तपासणी करून सात दिवसांत अहवाल सादर करा – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे
मुंबई

इगतपुरीतील औद्योगिक प्रदूषणाची तपासणी करून सात दिवसांत अहवाल सादर करा – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 23, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या उभारणीची व्यवहार्यता तपासण्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे निर्देश

मुंबई, प्रतिनिधी : इगतपुरी परिसरातील उद्योगांमुळे होणाऱ्या जलप्रदूषणाच्या तक्रारींची प्रत्यक्ष पाहणी करावी. संबंधित उद्योगांची सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा, सांडपाणी विसर्गाची ठिकाणे तसेच परिसरातील नदी, नाले आणि विहिरींमधील पाण्याचे नमुने तपासून सात दिवसांत सविस्तर अहवाल सादर करावा, असे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

इगतपुरी येथील औद्योगिक प्रदूषणासंदर्भात मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी आमदार हिरामण खोसकर, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

इगतपुरी परिसरातील काही उद्योगांकडून प्रक्रिया न करता रासायनिक सांडपाणी नदी-नाल्यांमध्ये सोडले जात असल्याने लगतच्या गावांतील विहिरींचे पाणी दूषित होत असल्याची बाब आमदार खोसकर यांनी बैठकीत मांडली. या प्रदूषणामुळे शेतीचेही नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.

” लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायतींकडून प्राप्त तक्रारींची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित उद्योगांची तातडीने तपासणी करावी. उद्योगांमध्ये उपलब्ध सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा कार्यान्वित आहे का, प्रक्रिया केलेले अथवा न केलेले पाणी बाहेर सोडले जाते का, रात्रीच्या वेळी टँकरद्वारे सांडपाणी सोडले जाते का, याची प्रत्यक्ष पडताळणी करावी. मागील दोन वर्षांत संबंधित उद्योगांवर केलेल्या कारवाईची माहितीही अहवालात समाविष्ट करावी, असेही त्यांनी सांगितले”

……. पंकजा मुंडे, पर्यावरण मंत्री,महाराष्ट्र 

परिसरातील उद्योग तीन ते चार किलोमीटरच्या परिघात असल्यास त्यांच्यासाठी सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र (सीईटीपी) उभारता येईल का, याचा अभ्यास करावा. त्यासाठी आवश्यक गुंतवणूक, उद्योगांचा सहभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहकार्य याबाबत उपाययोजना सुचवाव्यात. प्रदूषणाची व्याप्ती, पाण्याच्या नमुन्यांचे निष्कर्ष, उद्योगांतील प्रक्रिया व्यवस्था आणि संभाव्य उपाययोजनांचा समावेश असलेला कृती आराखडा तयार करावा, असेही मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहाराष्ट्र सदनातील पाककला स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Next Article गणेशम फेज-२ दुर्घटनेनंतर भाजपा शहराध्यक्षासह भाजपा आक्रमक
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महिला व बालकांचे हक्क व कल्याण समितीकडून मुंबईतील वसतिगृहे, अनाथालयाची पाहणी

September 2, 2026

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शेतीचे मॅपिंग करून शेतीचा अद्ययावत डेटा तयार करण्यास प्राधान्य द्या – कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल

September 2, 2026

प्रधान सचिव विनीता वेद सिंगल यांची अपर मुख्य सचिवपदी पदोन्नती

September 2, 2026

सुट्या खाद्यतेल व्यावसायिकांना कायद्यानुरूप बदलांसाठी एक वर्षाची मुदत — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?