Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»शहरात गुन्ह्यांची मालिका; खूनाचा प्रयत्न, अमली पदार्थ, जुगार अन् शस्त्रबाळगण्याच्या कारवाया
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

शहरात गुन्ह्यांची मालिका; खूनाचा प्रयत्न, अमली पदार्थ, जुगार अन् शस्त्रबाळगण्याच्या कारवाया

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 22, 2026No Comments5 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २१ सप्टेंबर २०२६ रोजी विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले. यामध्ये खूनाचा प्रयत्न, अमली पदार्थांची बेकायदा वाहतूक व विक्री, जुगार, शस्त्रबंदी आदेशाचा भंग, वाहन अपघात, वाहन चोरी, मारहाण तसेच आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांचा समावेश आहे.

पोलिसांच्या वाहनाला धडक देत कर्मचाऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न

चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार, सुखदेव हनुमंत नाईक (वय २९, रा. आरग, ता. मिरज, जि. सांगली) याने बार गाडी क्रमांक MH 08 BG 6984 निष्काळजीपणे चालवत मोशी-चाकण-शिक्रापूर मार्गावर वाहनांना धडक दिली. त्यानंतर वडगाव घेनंद येथे पोलिसांनी वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पोलिस कर्मचाऱ्यांच्या दिशेने वाहन नेल्याचा आरोप आहे. या घटनेत सरकारी वाहनाचे नुकसान झाले असून एका पोलिस कर्मचाऱ्याच्या हाताला दुखापत झाल्याची नोंद आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

चारधाम यात्रेच्या नावाखाली सव्वाचार लाखांची ऑनलाइन फसवणूक

रावेत पोलीस ठाण्यात चारधाम यात्रेच्या नावाखाली ऑनलाइन आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. रामनिवास बनारसीदास गुप्ता (वय ६६) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोशल मीडियावरील जाहिरातीद्वारे संपर्क झाल्यानंतर त्यांनी चारधाम यात्रेसाठी ४ लाख ४०० रुपये ऑनलाइन पाठविले. त्यानंतर विम्याच्या नावाखाली आणखी पैसे मागण्यात आले. संशय आल्याने संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संबंधित व्यक्तीने फोन बंद केला आणि बुकिंग केलेली विमानाची तिकिटेही रद्द करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. प्रकरणी अभिषेक कपूर नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिंचवडमध्ये किरकोळ वादातून तिघांकडून मारहाण

चिंचवड पोलीस ठाण्यात अतुल शाम यादव (वय २८) यांच्या फिर्यादीवरून रोहित खताळ, कार्तिक कांबळे आणि साहिल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तिरुपती एंटरप्रायजेस, गांधी पेठ, चिंचवड येथील पार्किंगमध्ये जुन्या किरकोळ वादातून आरोपींनी शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने व हाताने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

आळंदीत काठीने मारहाण

आळंदी पोलीस ठाण्यात विकास किसना बहादूर सावंत यांच्या फिर्यादीवरून बोगेश पेसोडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. इंद्रायणी घाट परिसरात झालेल्या घटनेत काठीने मारहाण करून डोक्याला व डाव्या बरगडीला दुखापत केल्याचा आरोप आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

निगडीत वादातून चाकूने हल्ला

निगडी पोलीस ठाण्यात रोहित भाऊसाहेब गाडे यांच्या फिर्यादीवरून जसमित सिंग, अमन सिंग आणि मनमित सिंग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. नवीन वाहन घेण्याच्या कारणावरून वाद झाल्यानंतर मारहाण करून चाकूने हातावर वार केल्याचे तसेच लोखंडी कड्याने पाठीत मारहाण व शिवीगाळ करून धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेत एका महिलेलाही किरकोळ दुखापत झाल्याची नोंद आहे.

मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून दुचाकीस्वाराला धडक

विधी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. डी.टी.डी.सी. कंपनीसमोरील रस्त्यावर हुंडाई आय-२० कारने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वाराच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. संबंधित कारचालकाने मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविल्याचा आरोप नोंदविण्यात आला आहे.

बडमुखवाडीत आयशरच्या धडकेत पायाला गंभीर दुखापत

दिघी पोलीस ठाण्यात रायचंद महादू भालेकर (वय ६५) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आयशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तापकीर चौक, बडमुखवाडी येथे आयशर वाहनाने त्यांच्या वाहनाला धडक देऊन उजव्या पायावरून चाक गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अपघातानंतर चालक वाहनासह पसार झाल्याचे नोंद आहे.

पिंपळे गुरवमध्ये कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

सांगवी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, पिंपळे गुरव येथील एट-टू-एट गार्डनजवळ इर्टिगा कारने बुलेटला धडक दिली. या अपघातात बुलेटस्वाराच्या हात, पाय व शरीराच्या उजव्या भागाला गंभीर दुखापत झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. वाहनचालक किरण सानप याचा शोध घेण्यासाठी तपास पथक रवाना करण्यात आले आहे.

बावधनमध्ये अॅक्टिव्हा चोरी

बावधन पोलीस ठाण्यात चंद्रकांत प्रभुराव श्रीगिरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तीर्थ अवेला सोसायटी परिसरातून लॉक करून ठेवलेली सुमारे ३० हजार रुपये किमतीची ग्रे रंगाची अॅक्टिव्हा-५जी दुचाकी चोरीस गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

बँकेने ताब्यात घेतलेल्या मालमत्तेचे सील तोडल्याचा आरोप

भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बँकेच्या ताब्यातील मालमत्तेचे सील व दरवाजांचे लॉक तोडून अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी महिला आरोपीसह तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेने लावलेला बॅनर पाडून नुकसान केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

महाळुंगे परिसरात जुगार अड्ड्यावर कारवाई

उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी भांबोली गावाच्या हद्दीत जुगाराविरोधात कारवाई केली. विमल रामदेव यादव, राजेंद्र फुल्लन प्रसाद गुप्ता आणि संजय कुमार राजकुमार गौतम या तिघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाईत १,८५० रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे पत्ते जप्त करण्यात आले.

चाकणमध्ये कल्याण मटका जुगाराचा पर्दाफाश

उत्तर चाकण पोलिसांनी कांदा मार्केट परिसरातील दुकानात सुरू असलेल्या कल्याण मटका जुगारावर कारवाई केली. पोलिसांच्या नोंदीनुसार, आरोपींकडून कागदी चिठ्ठ्यांवर सुमारे ९,७०० रुपयांचे मटका आकडे लिहून पैसे स्वीकारले जात होते.

तळेगाव एमआयडीसीत ३.८२० किलो गांजा जप्त

तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी कातवीता परिसरात कारवाई करून एका तरुणाकडून ३.८२० किलो गांजा जप्त केल्याची नोंद आहे. जप्त गांजाची किंमत १ लाख ९१ हजार रुपये, तर मोटारसायकलीसह एकूण मुद्देमालाची किंमत २ लाख २१ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेदनकरवाडीत देशी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात विधी संघर्षित बालकाकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केल्याप्रकरणी शस्त्र कायदा व महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ५१ हजार रुपये असल्याचे नोंदविण्यात आले आहे. सदर शस्त्र मध्य प्रदेशातील सुरजित सिंग याच्याकडून खरेदी केल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

भुकुममध्ये ४१८ ग्रॅम गांजा जप्त

बावधन पोलिसांनी भुगाव परिसरात केलेल्या कारवाईत अक्षय संतोष साळुंखे (वय २६) याच्याकडून ४१८ ग्रॅम गांजा जप्त केला. या अमली पदार्थाची किंमत २० हजार ७५० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

काळेवाडीत कोयता बाळगणाऱ्यावर कारवाई

काळेवाडी पोलिसांनी बेरवाडी स्मशानभूमीजवळ कारवाई करून आयुष आनंद वाकोडे (वय २०) याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या आदेशानुसार घातक शस्त्र बाळगण्यास मनाई असताना त्याच्याकडे लोखंडी कोयता आढळून आल्याने महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

पिंपरीत तीन पत्ती जुगारावर कारवाई; ४.१० लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या पथकाने तीन पत्ती जुगारावर कारवाई केली. रमाबाई नगर परिसरात नऊ जण पैसे लावून जुगार खेळत व खेळवत असल्याचे पोलिसांच्या नोंदीत म्हटले आहे. कारवाईत रोख रक्कम, तीन दुचाकी, एक रिक्षा आणि सहा मोबाईल असा एकूण ४ लाख १० हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या सर्व प्रकरणांचा संबंधित पोलीस ठाण्यांकडून पुढील तपास सुरू आहे.

Post Views: 11
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleवाकडमध्ये तरुणाचा खून; तिघांना अटक
Next Article मोका गुन्ह्यातील पाहिजे आरोपीकडून पिस्तूल, मॅग्झिन व जिवंत काडतुसे जप्त
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी

September 24, 2026

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गणेशोत्सव-२०२६ची यशस्वी सांगता

September 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?