Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

माणुसकी जिंकली! बालिकेला सुरक्षित पोलिसांच्या स्वाधीन करणाऱ्या दोघांचा सन्मान!

November 25, 2026

वाद विकोपाला गेला अन् तरुणीचा जीव गेला; प्रियकरावर खुनाचा गुन्हा

November 25, 2026

वाहनांच्या बॉडी निर्मिती क्षेत्रातील अजिल फायबरटेच्या लिगसी स्लीपर कोचला एआरएआयचे प्रमाणपत्र 

November 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»सीआयआरटीच्या हीरक महोत्सवी वर्षाचा प्रारंभ
पुणे

सीआयआरटीच्या हीरक महोत्सवी वर्षाचा प्रारंभ

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 15, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हीरक महोत्सवी वर्ष आणि लोगोचे अनावरण

पुणे, : केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेने (सीआयआरटी) आपल्या स्थापनेच्या ६०व्या वर्षात प्रवेश केला असून, २०२६-२७ हे वर्ष हीरक महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन जयराम गडकरी यांच्या हस्ते नागपूर येथे या महोत्सवी वर्षाचा औपचारिक प्रारंभ करण्यात आला. यावेळी हीरक महोत्सवी वर्षाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.

‘सुरक्षित आणि संरक्षित वाहतूक सुनिश्चित करणे’ ही संकल्पना लोगोच्या माध्यमातून मांडण्यात आली असून, रस्ते सुरक्षा, सुरक्षित वाहतूक, तांत्रिक नवकल्पना आणि भविष्यातील वाहतूक व्यवस्था यावर सीआयआरटीचा विशेष भर राहणार आहे.

सीआयआरटीचे संचालक डॉ. देवेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नितीन गडकरी यांची भेट घेतली. पुण्यातील सीआयआरटी येथे आयोजित करण्यात येणाऱ्या हीरक महोत्सवी वर्षाच्या मुख्य कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी गडकरी यांना निमंत्रित करण्यात आले. यावेळी त्यांना औपचारिक निमंत्रणपत्र आणि विशेष निमंत्रणिका प्रदान करण्यात आली.

शिष्टमंडळात सीआयआरटीचे संचालक डॉ. देवेंद्र सिंह, तांत्रिक सचिवालयाचे प्रमुख शेखर ढोले, ऑटोमोटिव्ह सायबरसुरक्षेचे प्रमुख फारुख मखदूम आणि संशोधन व सल्लागार सेवेचे प्रमुख उमेश सूर्यवंशी यांचा समावेश होता.

हीरक महोत्सवी वर्षभरात पुण्यात भव्य उद्घाटन सोहळा, वाहनांमधील परस्पर संवाद तंत्रज्ञानावरील राष्ट्रीय कार्यशाळा, वाहन सायबर सुरक्षा चाचणी प्रयोगशाळेचे उद्घाटन तसेच वाहन उत्पादकांसाठी चाचणी व प्रमाणन कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत.

विद्यार्थी व नवोदित व्यावसायिकांसाठी वाहन सायबर सुरक्षा कौशल्य विकास कार्यक्रम, तांत्रिक कार्यशाळा, ज्ञानमालिका, प्रवासी सुरक्षेबाबत जनजागृती अभियान आणि रस्ता सुरक्षा महिन्याचे विविध उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. तसेच सीआयआरटीच्या सहा दशकांच्या वाटचालीत योगदान देणाऱ्या मान्यवर व्यक्ती व संस्थांचा सन्मान करण्यात येणार आहे.

१९६७ पासून सीआयआरटीने भारताच्या रस्ते वाहतूक क्षेत्रात वाहन चाचणी, प्रमाणन, संशोधन, सल्लागार सेवा आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. हीरक महोत्सवी वर्षाच्या माध्यमातून अधिक सुरक्षित, संरक्षित, तंत्रज्ञानाधारित आणि शाश्वत रस्ते वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी नव्या उपक्रमांना चालना देण्यात येणार आहे.

Post Views: 20
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous ArticleRTE विद्यार्थ्यांकडून ‘ॲक्टिव्हिटी’च्या नावाखाली पैसे उकळल्याचा आरोप
Next Article शिक्षक दिनानिमित्त ब्रह्मदत्त विद्यालयातील दिव्यांग विदयार्थ्यांना शिक्षण शिक्षकांचा सत्कार
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

वाहनांच्या बॉडी निर्मिती क्षेत्रातील अजिल फायबरटेच्या लिगसी स्लीपर कोचला एआरएआयचे प्रमाणपत्र 

November 24, 2026

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांची माणुसकी अन् कर्तव्यदक्षतेचे दर्शन! चक्कर आलेल्या महिला प्रवाशाला तातडीने रुग्णालयात दाखल

November 23, 2026

पुण्यात अतिक्रमणांवर महापालिकेचा आठ क्षेत्रीय कार्यालयांतून कारवाईचा बडगा!

November 22, 2026

४० सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपीचा माग काढला; १९ वर्षीय तरुण अटकेत

November 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

माणुसकी जिंकली! बालिकेला सुरक्षित पोलिसांच्या स्वाधीन करणाऱ्या दोघांचा सन्मान!

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 25, 20260

अनिल काची आणि अजय कांबळे यांच्या सतर्कतेमुळे बालिका सुरक्षितपणे पोलिसांच्या ताब्यात; पोलीस उपआयुक्त संदीप आटोळे…

वाद विकोपाला गेला अन् तरुणीचा जीव गेला; प्रियकरावर खुनाचा गुन्हा

November 25, 2026

वाहनांच्या बॉडी निर्मिती क्षेत्रातील अजिल फायबरटेच्या लिगसी स्लीपर कोचला एआरएआयचे प्रमाणपत्र 

November 24, 2026

मोबदला घेतला, तरी रस्ते अडवले! रहाटणी-काळेवाडीचा विकास आरक्षणांमध्ये अडकला

November 24, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?