Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»नोकरीचे आमिष, बनावट नियुक्तीपत्र अन् लाखोंचा गंडा!
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

नोकरीचे आमिष, बनावट नियुक्तीपत्र अन् लाखोंचा गंडा!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 13, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात नोकरी लावण्याच्या नावाखाली पाच जणांची फसवणूक; रेकॉर्डवरील आरोपीला खंडणीविरोधी पथकाने ठोकल्या बेड्या

पिंपरी चिंचवड, दि. १३ सप्टेंबर २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बनावट कागदपत्रे व नियुक्तीपत्रे तयार करत अनेकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला खंडणीविरोधी पथक, गुन्हे शाखेने शिताफीने ताब्यात घेतले. प्रतीक राजेश धायींजे (वय २६, रा. चक्रपाणी वसाहत, शास्त्री चौकाजवळ, आळंदी रोड, भोसरी, ता. हवेली, जि. पुणे; मूळ रा. अकलूज, जि. सोलापूर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

खंडणीविरोधी पथकाला दि. १२ सप्टेंबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, प्रतीक धायींजे हा अनेकांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक करत असल्याचे समोर आले. पथकाने फसवणूक झालेल्या व्यक्तींशी संपर्क साधून माहिती घेतली असता, आरोपीने पाच जणांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात नोकरी लावण्याचे सांगून बनावट कागदपत्रे व नियुक्तीपत्रे तयार केली आणि तब्बल १ लाख १४ हजार ११२ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले.

यानंतर आरोपीचा शोध घेत असताना तो शिवरोड, धावडे वस्ती, भोसरी परिसरात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतले.

आरोपीची अधिक चौकशी केली असता, त्याच्याविरुद्ध यापूर्वीही फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. म्हाडामध्ये स्वस्त घर मिळवून देतो, असे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करत त्याने २२ लाख ४१ हजार ७६० रुपये उकळल्याचे पोलिस तपासात यापूर्वी निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३३६(३), ३३८, ३४०(२) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

दरम्यान, पाणीपुरवठा विभागातील नोकरीच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी फिर्यादीने भोसरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक ५६६/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३१८(२), ३१८(४) अन्वये दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी प्रतीक धायींजे याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी भोसरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे.

ही कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, मा. सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. सारंग आव्हाड, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. रोहिदास पवार आणि मा. सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) श्री. सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील तसेच पोलीस हवालदार प्रदीप पोटे, प्रदीप गोडांवे, किरण जाधव आणि किशोर कांबळे यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कारवाई केली.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, नोकरी, स्वस्त घर, सरकारी योजना अथवा अन्य कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. कोणत्याही व्यक्तीने पैसे घेऊन नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिल्यास त्याची सत्यता तपासावी आणि संशयास्पद प्रकार आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा.

Post Views: 6
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleगुटखा तस्करांना शिरगाव परंदवडी पोलिसांचा दणका!
Next Article गणेशोत्सवापूर्वी पिंपरी-चिंचवड पोलिसांचा धडाका; ५३ सराईत गुन्हेगार तडीपार!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी

September 24, 2026

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गणेशोत्सव-२०२६ची यशस्वी सांगता

September 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?